Tarun Bharat

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा 20 जणांचा संघ

Advertisements

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेट न्यूझीलंड आपला 20 जणांचा संघ निवडणार आहे. सर्वसाधारणपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी 15 किंवा 16 जणांचा संघ पाठविला जातो. पण यावेळी न्यूझीलंड संघात 20 खेळाडू राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला.

 भारतामध्ये कोरोना प्रतिबंधक लस तयार झाली. पण गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीनंतर भारतात पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या चार दिवसांच्या कालावधीत कोरोना रूग्ण हजारोंच्या संख्येत नव्याने आढळत असल्याने आरोग्य खात्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱया आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे.  या स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा 20 जणांचा संघ भारतात दाखल होईल, अशी माहिती संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी दिली आहे.

टी-20 विश्वचषक स्पर्धेवेळी शेवटच्याक्षणी कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी क्रिकेट न्यूझीलंडने सावधगिरीचा उपाय म्हणून खेळाडूंच्या संख्येत वाढत करण्याचे ठरविले आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात येणाऱया न्यूझीलंड संघामध्ये काही नवोदितांना संधी मिळू शकेल, असेही स्टेड यांनी सांगितले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला येत्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ हा अद्याप धोकादायक असल्याचे मत स्टेड  यांनी व्यक्त केले. ऑस्ट्रेलियात झालेल्या बिगबॅश टी-20 स्पर्धेमुळे ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ फॉर्ममध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Stories

धोनीला इतक्यात निवृत्त करु नका

Patil_p

ऍशेस मालिकेतील कसोटी केंद्रामध्ये बदल

Patil_p

यू-18आशियाई व्हॉलीबॉलमध्ये भारताला कांस्यपदक

Patil_p

निवड समितीसाठी माजी खेळाडूंचे अर्ज दाखल

Patil_p

व्हेरेव्ह, नदाल, जोकोविच, अल्कारेझ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

क्रिकेट न्यूझीलंडला मालिका भरवण्यास परवानगी

Patil_p
error: Content is protected !!