Tarun Bharat

‘टूलकिट’प्रकरणी बेंगळूरमधून पहिली अटक

दिशा रवि हिला 7 दिवसांची पोलीस कोठडी – दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रतिनिधी/ बेंगळूर

शेतकऱयांच्या आंदोलनाबाबत ग्रेटा थनबर्ग यांच्या टूलकिट संबंधाप्रकरणी बेंगळुरात अटक करण्यात आलेल्या परिसर कार्यकर्त्या दिशा रवि हिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाला संबंधित ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरातील रहिवासी दिशा हिला दिल्ली पोलिसांनी अटक करून दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर केले असता तिला 7 दिवस पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

क्रियेटर्स ऑफ टूलकिटविरुद्ध दिल्लीत प्रकरण दाखल होते. याबाबत चौकशीवेळी दिशा यांचे नाव उघडकीस आले. त्यामुळे बेंगळुरात आलेल्या दिल्ली पोलिसांनी सोलदेवनहळ्ळी येथे राहणाऱया दिशा रवि हिला ताब्यात घेतले. त्यानंतर तिला थेट दिल्लीला घेऊन जाऊन पाटियाला हाऊस न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने याची चौकशी करीत दिशा रवि यांना 7 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

यापूर्वी न्यायाधीशांसमोर वाद मांडताना पोलिसांनी, भारत सरकारविरुद्ध मोठे षड्यंत्र रचले जात आहेत. खालिस्तान चळवळीला संबंधित चौकशीसाठी दिशा रवि हिला पोलीस कोठडी आवश्यक आहे. त्यानुसार तिला 7 दिवस पोलिसांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी केली. त्यानंतर पोलिसांच्या युक्तीवादाला मान्यता देत न्यायालयाने दिशा रवि हिला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मजकुरात दोन दुरुस्त्या केल्याची कबुली

दरम्यान, चौकशीवेळी दिशा रवि हिने ग्रेटा थनबर्ग टूलकिट मजकुरात केवळ 2 ओळींची दुरुस्ती केली होती. तसेच या माध्यमातून शेतकऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे तिने सांगितल्याचे समजते. बेंगळूरमधील प्रतिष्ठित महिला महाविद्यालयांपैकी माऊंट कार्मल महाविद्यालयाच्या दिशा रवि विद्यार्थिनी असून शहरातील खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. तसेच तिच्याविरुद्ध देशद्रोह, गुन्हेगारी कट रचण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

कर्नाटकातील मुली भारतीय महिला क्रिकेट संघात

Archana Banage

कर्नाटक सीडी प्रकरण: रमेश जारकिहोळी यांना अटक होण्याची शक्यता

Archana Banage

कर्नाटक एसएसएलसीचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता

Archana Banage

‘तेजस’ लढाऊ विमान खरेदीसाठी ४८ हजार कोटी

Archana Banage

कर्नाटक: गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त : गृहमंत्री

Archana Banage

राज्यात कोरोनाबळींचा आकडा वाढला

Amit Kulkarni
error: Content is protected !!