Tarun Bharat

टॅक्सीवाल्यांचे धरणे आंदोलन सुरूच

आंदोलनासाठी पाच दिवसांसाठी मुदत वाढवून देण्याची मागणीः

प्रतिनिधी/ पणजी

 येथील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसांपासून गोवा माईल्स रद्द करा, या मागणीसाठी टॅक्सीवाल्यांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. आंदोलनकर्त्यांची मुदत काल संपली असून ती आणखी पाच दिवसांसाठी वाढवून देण्याच्या मागणीसाठी टॅक्सी मालकांनी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत या अर्जाचे उत्तर मिळाले नाही. तरीही मुदत वाढवून दिल्याचे गृहित धरून आंदोलन सुरूच ठेवणार, असल्याचे टॅक्सी चालक-मालकांनी सांगितले.

आमचा निर्णय ठाम असून गोवा माईल्स जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका टॅक्सी चालक-मालकांनी घेतली आहे. सरकार मनमानी कारभार करून काही गोष्टी आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आम्ही स्वीकारणार नाही. टॅक्सी व्यवसाय म्हणजे आमच्या कुटुंबाच्या पालन पोषणाचे साधन असून तिथे कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. स्थानिकांच्या पोटावर पाय ठेऊन गोवा माईल्सच्या नावाखाली परप्रांतीयांना सरकार मदत करीत आहे. आमच्या आंदोलनात खो घालण्यासाठी आम्हाला मुदत वाढ देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारने मुदतवाढ न दिल्यास आम्ही सहकुटुंबासह रस्त्यावर बसणार असल्याचे इशाराही टॅक्सी मालकांनी दिला आहे.

आंदोलनाच्या पाचव्या दिवशी युवा काँग्रेस प्रदेश समितीने आझाद मैदानावर येऊन आंदोलनाला पाEिठबा जाहीर करून भाजप सरकारवर टीका केली. आमदार रेजिनाल्ड, मगोचे दीपक ढवळीकर, बस मालक संघटनेचे सुदीप ताम्हणकर आदींनी आझाद मैदानावर भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

‘करो किंवा मरो’ची भूमिका घ्या ः ताम्हणकर

हे शेवटचे आंदोलन आहे, असे मानून ‘करो किंवा मरो’ अशीच भूमिका घ्या, असे आवाहन सुदीप ताम्हणकर यांनी केले. गोवा माईल्स ऍप हे पूर्णपणे बेकायदा आहे हे आरटीआयच्या माध्यमातून मिळविलेल्या माहितीवरून स्पष्ट होत आहे. आयएएस अधिकाऱयांची एक समिती स्थापन करून गोवा माईल्स, कसे बेकायदेशीर आहे ते दाखवून देण्यासाठी टॅक्सी चालक-मालकांना व्यासपीठ द्यावे, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली. सरकार केवळ आपलेच घोडे दामटत आहे, टॅक्सी मालकांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसल्याने सरकार जनतेचे नसून केवळ स्वहित साधण्यासाठी असल्याचा आरोपही ताम्हणकर यांनी केले आहे.

Related Stories

ऑनलाईन शिक्षणाची मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत

Patil_p

फोंड्यातून शनिवारी तीन उमेदवारी अर्ज दाखल

Patil_p

‘लोकमान्य’ सोसायटी लोकांच्या विश्वासाला पात्र

Omkar B

मांदे येथे शॅकला आग; सात लाखांची हानी

Amit Kulkarni

मडगावातील मजुरांची वाढती वर्दळ ठरतेय चिंतेचा विषय

Omkar B

आता पाणी ग्राहकांसाठी एकरकमी परतफेड योजना

Patil_p
error: Content is protected !!