Tarun Bharat

टेंम्पोच्या आणि दुचाकीच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू

Advertisements

कुर्डुवाडी /प्रतिनिधी

दिवाळी सुटीसाठी आईवडिलांसह मामाच्या गावाला निघालेल्या लहानग्या शिवराजचा वाटेतच दुचाकी व टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकीवरील त्याचे आई-वडिल जखमी झाले आहेत. ही घटना २९ तारखेला सायंकाळी ७ च्या सुमारास टेंभुर्णी-कुर्डुवाडी रस्त्यावर घडली.याबाबत दुचाकीस्वार शरद अनंता बोराडे (रा.उरळीकांचन ता.हवेली) यांनी कुर्डुवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी आपली पत्नी व दोन वर्षाच्या मुलासह उरळीकांचन हून मुलाच्या मामाच्या गावी माढा येथे दिवाळी सणाकरीता दुचाकी (क्र. एम .एच १२ क्यू/ क्यू / २७२१) वरुन निघाले होते. अवघ्या १८ कि.मी वर माढा असताना टेंभुर्णी – माढा रस्त्यावर कुर्डू नजीक सायंकाळी ७ वा सुमारास समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात टेम्पोच्या चालकाने फिर्यादीच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये फिर्यादीचा मुलगा शिवराज शरद बोराडे वय २ वर्षे हा गंभीर जखमी होऊन मयत झाला.तसेच फिर्यादी व त्याची पत्नी जखमी झाले आहेत. टेम्पो चालकाने त्यांना उपचारासाठी न नेता तेथून पळ काढला . बोराडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात टेम्पोच्या अज्ञात चालकावर कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. .

Related Stories

प्रभागरचना तयार करताना राजकीय हस्तक्षेप; निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

Abhijeet Khandekar

दिलासा : सोलापूर शहरात 68 रुग्णांना डिस्चार्ज, 8 नवे रूग्ण

Archana Banage

सोलापूर: “लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे”, उपमुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाच्या चरणी साकडं

Archana Banage

माढा तालुक्यात पाच कोरोनाबाधितांची भर

Archana Banage

देवेंद्र फडणवीस यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के, शिक्षक मतदारसंघसाठी 85.09 टक्के मतदान

Archana Banage
error: Content is protected !!