Tarun Bharat

टेक्सटाईल, फुटवेअरवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय तुर्तास स्थगित

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

1 जानेवारीपासून टेक्सटाईल आणि फुटवेअरवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने यापूर्वीच घेतला होता. मात्र, राज्य सरकारे आणि टेक्सटाईल इंडस्ट्रीजने विरोध केला होता. त्यामुळे आज झालेल्या 46 व्या जीएसटी परिषदेत टेक्सटाईल आणि फुटवेअरवरील जीएसटी वाढविण्याचा निर्णय तुर्तास स्थगित करण्यात आला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची 46 वी बैठक सुरू आहे. टेक्सटाईलवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्के करण्याला अनेक राज्यांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रस्तावावर पुन्हा विचार करून परिषद नवीन प्रस्ताव आणणार आहे. काही वस्तूंवर लागू होणारे जीएसटी दर नव्याने लावले जाऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लक्झरी वस्तूंवरचा जीएसटी दर आणखी वाढणार का याकडे लक्षं लागलं आहे. दरम्यान, फुटवेअर आणि टेक्सटाईल दर वाढवण्यास तूर्तास स्थगिती देण्यात आल्यानं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या बैठकीत जीएसटीच्या 12 टक्के आणि 18 टक्के कर स्लॅबचे एकत्रिकरण करुन एकच कर ठेवण्यावरही चर्चा होऊ शकते, असेही सांगण्यात येते.

Related Stories

‘फायझर’च्या 5 कोटी लस भारत खरेदी करणार

Patil_p

देशात 2.80 कोटी रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

मोदी-शाह यांच्यासोबत संघाची बैठक

Patil_p

पोटनिवडणुकीनंतर कोसळणार नितीश सरकार

Patil_p

3 हेलिकॉप्टर्ससह पोहोचला भंगाराचा व्यापारी

Patil_p

लाकडांमध्ये जीव ओतणारी काष्ठ कलाकार

Patil_p
error: Content is protected !!