Tarun Bharat

टेनिसपटूंना मिळणार आयटीएफची आर्थिक मदत

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अगदी कमी मानांकन असलेल्या टेनिसपटूंसाठी आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून याचा लाभ एकेरी आणि दुहेरीतील टेनिसपटूंना होणार आहे. कोरोना महामारी संकटामुळे स्थगित करण्यात आलेल्या क्रीडा हालचालीमुळे आर्थिक समस्येला तोंड देणाऱया खेळाडूंसाठी यापूर्वी फेडरेशनतर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोव्हिड-19 महामारी संकटाने क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंची आर्थिक स्थिती अत्यंत केविलवाणी झाली आहे. एटीपी, डब्ल्यूटीए तसेच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा भरविणारी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि फ्रान्स या देशांतील अव्वल टेनिसपटूंनी सर्बियाचा टॉप सीडेड नोव्हॅक जोकोव्हिकच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 60 लाख अमेरिकन डॉलर्सचा निधी गोळा करून त्यांनी तो 800 टेनिसपटूंमध्ये वाटप केला. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनकडून टेनिसपटूंना आर्थिक साहाय्य दिले जाणार असून पुरूष आणि महिलांच्या एकेरीच्या मानांकनात 500 आणि 700 या क्रमवारीत असलेल्या टेनिसपटूंना हे साहाय्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे दुहेरीच्या मानांकनातील 175 ते 300 या क्रमवारीत असलेल्या पुरूष आणि महिला टेनिसपटूंनाही याचा लाभ मिळणार असल्याचे आयटीएफच्या सूत्रानी सांगितले. प्रत्येक टेनिसपटूंला सर्वसाधारण 2000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम संबंधित राष्ट्रीय फेडरेशनमार्फत दिली जाणार आहे.

भारतातील कमाल 12 टेनिसपटूंना याचा लाभ मिळणार आहे. पुरूष एकेरीमध्ये मनिष सुरेशकुमार आणि अर्जुन कढे यांचा यात समावेश असून सुमीत नागल, पी. गुणेश्वरन, रामकुमार रामनाथन, शशीकुमार मुकुंद, साकेत मायनेनी, सिद्धार्थ रावत यांचाही यामध्ये समावेश आहे. दुहेरीत मायनेनी, विष्णु वर्धन, कढे आणि एन. विजय सुंदर प्रशांत यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पुरूष दुहेरीच्या मानांकन यादीमध्ये भारताच्या सात टेनिसपटूंचा समावेश आहे. महिला एकेरीच्या मानांकन यादीत 500 आणि 700 या क्रमवारीतील टप्प्यात भारताच्या चार खेळाडूंचा समावेश असून करमन कौर थांडी, एस बावीशेट्टी, झिल देसाई आणि प्रांजला येडलापल्ली यांना याचा लाभ मिळणार आहे.

कोरोना महामारी समस्येमुळे मे महिन्यात होणारी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा सप्टेंबर महिन्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा ऑगस्टमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे. एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सर्व स्पर्धा यापूर्वीच स्थगित करण्यात आली असून ऑगस्टनंतरच त्या खेळविली जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंडची मालिकेत विजय सलामी

Patil_p

पाकिस्तान सुरक्षित देशांपैकी एक : गेल

Patil_p

पावसामुळे दुसऱया दिवशीचा खेळ वाया

Patil_p

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ

Patil_p

आरपी सिंगच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

Patil_p

इंग्लंडच्या महिला संघात एमा लँबचा समावेश

Amit Kulkarni
error: Content is protected !!