Tarun Bharat

टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण

Advertisements

बेलग्रेड / वृत्तसंस्था

जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा टेनिस खेळाडू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण झाली आहे. डेली मेल रिपोर्टने यासंबंधी वृत्त दिलं आहे. नोवाक जोकोविच टेनिस दौऱ्यासाठी गेला होता. तिथे दोन कार्यक्रमांमध्ये त्याने सहभाग नोंदवला होता. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं नव्हतं असंही डेली मेलने म्हटलं आहे. इतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आल्यानंतर नोवाकने चाचणी केला असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

नोवाकच्या पत्नीलाही कोरोनाची लागण झाली असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नोवाक १४ दिवस विलगीकरणात राहणार आहे. अद्याप तरी नोवाकमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं आढळलेली नाहीत. स्टेटमेंट जारी करताना त्याने सांगितलं आहे की, “बेलग्रेड येथे पोहोचताच आम्ही कोरोना चाचणी केली असताना माझा आणि पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुदैवाने मुलांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आहे”.

नोवाकने सर्बिया आणि क्रोएशिया येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. येथील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. यानंतर नोवाकने आपली चाचणी करुन घेतली. अंतिम सामना रद्द झाल्यानंतर नोवाक क्रोएशियाला निघून गेला होता. यानंतर त्याने आपली चाचणी केली होती. याआधी स्पर्धेत सहभागी विक्टर ट्रोईकी याने आपण आणि आपल्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारा नोवाक या दौऱ्यातील मुख्य चेहरा होता.

Related Stories

जयपूर पिंक पँथर्स, बेंगळूर बुल्सचे एकतर्फी विजय

Patil_p

देशभरात ऑनलाईन क्लासेसची चलती : माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन

Patil_p

प्लेऑफ स्थान निश्चित करण्यास दिल्ली कॅपिटल्स उत्सुक

Patil_p

युवा टेटेपटू मानव ठक्कर जागतिक क्रमवारीत अव्वल

Patil_p

मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापकाची हकालपट्टी

Patil_p

लखनौचा दिल्ली कॅपिटल्सवर विजय

Patil_p
error: Content is protected !!