Tarun Bharat

टेनिस खेळण्यात तरबेज श्वान

दातांनी रॅकेट पकडून मारतो शॉट्स

माणूसच नव्हे तर प्राण्यांमध्येही टॅलेंटची कुठलीच कमतरता नसते. असाच एका लियो नावाचा श्वान टेनिस आणि पिंग पॉन्ग खेळण्यात तरबेज आहे. लियोला ही निसर्गदत्त देणगी मिळाली असल्याचे त्याच्या मालकाचे म्हणणे आहे.

कॉकर स्पॅनियल लियोचे हे टॅलेंट एखाद्या विम्बल्डन स्टारपेक्षा कमी नाही. 31 वर्षीय एमिली अँडरसन नावाच्या स्कॉटलंडमध्ये राहणाऱया डॉग ओनरचा हा श्वान 2 वर्षांचा आहे, परंतु त्याला रॅकेट पकडून टेनिस खेळण्याचे पूर्ण ज्ञान आहे.

गार्डनमध्ये पटापट टेनिल बॉलद्वारे शॉट्स मारण्यात तो हुशार आहे. पूर्ण घराच्या आसपास तो एखाद्या परिपूर्ण टेनिसपटूप्रमाणे खेळतो आणि त्याचा खेळ पाहून लोक अवाप् होतात. एमिली स्वतः डॉग ट्रेनर असून त्यांना स्वतःच्या श्वानाला रॅकेट दिल्यावर त्यांना उत्तम कौशल्य दिसून आले.

लियोमध्ये टेनिस खेळण्याचे कौशल्य निसर्गदत्त आहे. लियोकडून अवजड टेनिस बॉल हाताळण्याची अपेक्षा नव्हती, परंतु त्याने उत्तम शॉट सातत्याने मारून दाखविल्याचे एमिली यांनी सांगितले आहे. याचबरोबर लियो उत्तम सीपीआर करणे आणि चित्र रंगविणे देखील जाणतो. मल्टीटॅलेंट असलेल्या या श्वानाला त्याच्या मालकीणीने पिंग पॉन्ग खेळणे, जाइलोफोन वाजविणे शिकविले आहे. प्रत्येक ट्रिक तो सहजपणे शिकून घेतो.

10 मिनिटांसाठी त्याला एक ट्रिक दिवसातून 3 वेळा शिकविते. लियोने वॉक अधिक केला असल्यास त्याचे प्रशिक्षण टाळते. परंतु लियोला स्वतःच्या प्रशिक्षणाच्या सर्व गोष्टी समजतात असे एमिली यांचे म्हणणे आहे. एमिली यांच्या इन्स्टाग्राम अकौंटवर लियोचे टेनिस खेळतानाचे अनेक व्हिडिओ आहेत. एमिली यांचे 12,400 फॉलोअर्स असून ते लियोची छायाचित्रे आणि व्हिडिओंना विशेष पसंती दर्शवित असतात.

Related Stories

अमेरिकेत कोरोनाचे मृत्यूतांडव

prashant_c

हाफिझ सईदसह सहाजण दोषमुक्त

Patil_p

भूकंपबळींचा आकडा 30 हजारांहून अधिक

Patil_p

ब्रिटनने महात्मा गांधींच्या स्मृतीप्रित्यर्थ सादर केले नवे नाणे

Patil_p

मोबाईल वाजवतोय धोक्याची घंटी

Patil_p

कोलंबसचा पुतळा प्रखर विरोधानंतर हटवला

Patil_p