Tarun Bharat

टेम्पोची दुचाकीला धडक; दोघेजण जखमी

Advertisements

कुर्डुवाडी / प्रतिनिधी:

कुर्डुवाडी शहरात संचारबंदीच्या काळात शहरातील मुख्य गांधी चौकात भरधाव वेगात येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकी टेम्पोच्या खाली गेली तर दुचाकीवरील पती- पत्नी जखमी झाले आहेत. यामध्ये जखमी दुचाकीस्वार अंकुश मेहेर यांचा पाय फॅक्चर झाला असून त्यांच्या पत्नी छाया या किरकोळ जखमी झाल्या आहेत. ही घटना दि. २४ रोजी दु. ११.४५ वा सुमारास घडली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की एम एच ४५ के ८४४२ दुचाकीवरील कुर्डू गावचे तलाठी अंकुश मेहर हे आपल्या पत्नी छाया समवेत गांधीचौकातून शिवाजी चौकाच्या दिशेने जात असताना उजव्याबाजूने मिठाई गल्लीतून गांधी चौकाकडे येणारा अत्यावश्यक सेवा असे लिहिलेला मालवाहतूक टॅम्पो ( एम एच २५ ए जे ००१३) ने भरधाव वेगात येऊन त्यांना जोरदार धडक दिली. काही अंतरावरून टेम्पो चालकाने ब्रेक मारला परंतू गाडीचा वेग अधिक असल्यामुळे त्यावर चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकी टॅम्पोच्या खाली आडवी आडकली होती. दुचाकीवरील तलाठी मेहेर यांचा या अपघातात पाय फॅक्चर झाला असून त्यांच्यावर येथील खासगी रूग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यांच्या पत्नीही यामध्ये किरकोळ जखमी झाल्या आहेत. सध्या संचारबंदीमुळे शहरात इतर वाहने व गर्दी कमी असल्यामुळे अशी वाहने मोकळ्या रस्त्यावरून सुसाट सुटतात आणि अपघातास कारणीभूत ठरतात. तरी वाहनधारकांनी आपल्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

Related Stories

बार्शी येथे आंतरराज्य आरोपींना अटक, साडेपाच लाखांचा ऐवज जप्त

Sumit Tambekar

भोंगा एकच विषय नसून अजूनही बाहेर येतील- चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

पोलीस, होमगार्डला मारहाण केल्याप्रकरणी चौघे ताब्यात

Patil_p

मी अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही म्हणणाऱ्या राणेंना अजित पवारांचे उत्तर; म्हणाले…

datta jadhav

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Abhijeet Shinde

यंदा मान्सूनचे आगमन दहा दिवस आधी

datta jadhav
error: Content is protected !!