Tarun Bharat

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी-पावस मार्गावरील कुर्ली फाटा येथे टेम्पो-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार अल्ताफ हसन भाटकर (41, ऱा जुना फणसोप रत्नागिरी) यांचा मृत्यू झाल़ा रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास हा अपघात घडला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्ताफ रविवारी आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच 08 एल 0801) घेवून पावस ते फणसोप असा प्रवास करत होत़े रात्री पावणे अकराच्या सुमारास कुर्ली फाटा येथे समोरून येणारा ऍपे टॅम्पो (एमएच 08 क्यू 1786) ने अल्ताफ याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल़ी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अल्ताफ याचा मृत्यू झाल़ा या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आह़े पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक सकपाळ करत आहेत़ 

Related Stories

कातळ शिल्पांच्या जतन, संवर्धनाला प्रशासकीय मंजूरी

Patil_p

दोन दुचाकींची धडक बसून सावंतवाडीत अपघात

Anuja Kudatarkar

कशेडीत केवळ खेडवासीयांचेच स्वॅब

Patil_p

दशावतार महोत्सव तूफान गर्दीत

Anuja Kudatarkar

दापोलीकरांच्या पुढाकारातून कोरोना लसीकरण केंद्र

Patil_p

मनाई आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे संचलन

Anuja Kudatarkar