Tarun Bharat

टेम्पो-रिक्षा अपघातात मच्छीविक्रेत्या महिलेचा मृत्यू

रत्नागिरीतील ज़े  के. फाईल्स येथील घटना

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरालगतच्या ज़े के. फाईल्स येथे टेम्पो-रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघातात रिक्षातील मच्छीविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाल़ा  ही घटना शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास घडल़ी  या अपघातात रिक्षाचालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़

फरिदा अब्दुल जीवाजी (60, ऱा मिरकरवाडा रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आह़े तर रिक्षाचालक अजगर अली पठाण (52, ऱा भगवती बंदर पठाणवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत़  या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फरिदा या मच्छीविक्रीचा व्यवसाय करतात़  शुक्रवारी सकाळी फरिदा या रिक्षाचालक असगर पठाण यांच्या रिक्षामधून (एमएच 08 3618) मिरकरवाडा ते हातखंबा अशा मच्छी घेवून जात होत्य़ा

याचवेळी टेम्पोचालक जावेद आदम फकीर (34, ऱा चिपळूण) हा आपल्या  टेम्पो (एमएच 08 डब्लू 1497) घेवून चिपळूण ते मिऱया असा प्रवास करत होत़ा  ज़े के. फाईल्स येथे सकाळी 6 च्या सुमारास टेम्पोचा पुढील टायर फुटल्याने जावेद याचा गाडीवरील ताबा सुटल़ा यावेळी ताबा सुटलेल्या टेम्पोने समोरून येणाऱया रिक्षाला जोरदार धडक दिल़ी  या अपघातात फरिदा व रिक्षाचालक असगर यांना गंभीर दुखापत झाल़ी तर अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला तर टेम्पोच्याही पुढील भागाचे नुकसान झाले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या फरिदा यांना जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल़े यावेळी वैद्यकीय अधिकाऱयांनी फरिदा यांना तपासून मृत घोषित केले तर रिक्षाचालक असगर यांच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़ या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आह़े

Related Stories

देवगड-जामसंडे नगराध्यक्षपदी प्रियांका साळसकर

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात बँका सुरु, पण..

Archana Banage

Ratnagiri : साहिल मोरे आत्महत्या प्रकरण : मिताली भाटकरला अटकपूर्व जामीन मंजूर

Abhijeet Khandekar

गिरणी चालकांना मोठा फटका

NIKHIL_N

पर्ससीन मासेमारीला आजपासून प्रारंभ

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन कायम

Archana Banage