Tarun Bharat

टेस्ट घटल्यान नव्या रूग्ण संख्येतही घट तर जिल्ह्यात `म्युकर’चे ४ नवे रूग्ण

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर :

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत टेस्टींग वाढवल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढली होती. रविवारी टेस्टींग कमी झाले, परिणामी नव्या रूग्णांत घट झाली रविवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 637 नवे रूग्ण आढळून आले. सक्रीय रूग्णसंख्या  11 हजार 780 वर पोहाचली. दिवसभरात कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 350 जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात रविवारी कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 651 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 485, नगरपालिका क्षेत्रात 689, शहरात 958 तर अन्य 519 आहेत. दिवसभरात 1 हजार 350 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 36 हजार 525 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 637 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 65, भुदरगड 42, चंदगड 24, गडहिंग्लज 31, गगनबावडा 1, हातकणंगले 270, कागल 39, करवीर 349, पन्हाळा 119, राधानगरी 55, शाहूवाडी 43, शिरोळ 71, नगरपालिका क्षेत्रात 116, कोल्हापुरात 379 तर अन्य 20 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 52 हजार 956 झाली आहे.

 शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 18 हजार 954 अहवाल आले. त्यापैकी 17 हजार 318 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 4 हजार 611 अहवाल आले. त्यातील 4 हजार 237 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 13 हजार 420 अहवाल आले. त्यातील 12 हजार 548 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 914 रिपोर्ट आले. त्यातील 533 निगेटिव्ह आहेत.

शहरात कोरोनाने 11 जणांचा मृत्यू,

परजिल्ह्यातील मत्तीवडे बेळगाव व हरीपूर सांगली येथील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये फुलेवाडी, नवीन वाशी नाका, साने गुरूजी वसाहत, आर. के. नगर, राजारामपुरी, शिवाजी पेठ, देवणे गल्ली, राजारामपुरी, फुलेवाडी, ताराबाई पार्क, ए. वॉर्ड शिवाजी पेठ येथील व्यक्तींचा समावेश आहे.

टेस्ट       संख्या    पॉझिटिव्ह रूग्ण
आरटीपीसीआर टेस्ट 4611374
ऍटीजेन टेस्ट13420      882
ट्रुनेट टेस्ट914 381
एकूण टेस्ट       18945    1637

वर्गवारी               कोल्हापूर शहर       ग्रामीण, अन्य            एकूण

आजचे बाधीत रूग्ण          379                  1258          1637
आजपर्यतचे बाधीत       42465           1,10,491         1,52,956
आजचे कोरोनामुक्त      शहर व ग्रामीण       1350           1,36,525
दिवसभरातील मृत्यू              11                  22                33
आजपर्यंतचे एकूण मृत्यू       958             3693            4651
दिवसभरातील चाचण्या     पॉझिटिव्ह    निगेटीव्ह        एकूण
आरटीपीसीआर               374      4237        4611
अँटीजेन                       882     12548       13420
ट्रुनेट                             381        533         914                        
सक्रीय रूग्ण                                          11780
रूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत           89.77 टक्के
एकूण चाचण्या रविवार ः 18955      एकूण   10,67,801
मृतांची संख्या  ः  33     जिल्हा  ः  30      बाहेरील  ः 3
दीर्घकालीन व्याधी                      13                    2
60 वर्षावरील                            17                  1
पहिल्या 48 तासांत मृत्यू              8                    1       

आजअखेर मृत संख्या  4651   जिल्हा  ः  4132  अन्य ः 519

33 बळी, 1637 नवे रूग्ण, 1350 कोरोनामुक्त
कोरोना रूग्ण 1637 ः  एकूण ः  1,52,956
कोरोनामुक्त  1350 ः  एकूण ः  1,36,525
कोरोना मृत्यू  33 ः एकूण मृत्यू ः 4651
सक्रीय रूग्ण  ः 11780

जिल्ह्यात म्युकरचे 4 नवे रूग्ण, 45 जणांना डिसचार्ज

जिल्ह्यात रविवारी, म्युकर मायकोसीसचे 4 नवे रूग्ण दाखल झाले. म्युकरमुक्त 45 जणांना घरी पाठवण्यात आले.

शहरातील सीपीआरमध्ये रविवारी म्युकरचे 4 नवे रूग्ण दाखल झाले. सीपीआरमधून 27 आणि खासगी हॉस्पिटलमधून 18 अशा 45 म्युकरमुक्तांना डिस्चार्ज दिला. सध्या सीपीआरमध्ये 100 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 50 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.

Related Stories

कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील खड्डे मुजवा ; मलकापूर नागरिकांची मागणी

Abhijeet Shinde

महापुराच्या धास्तीने प्रयाग चिखलीकरांकडून जनावरांचे स्थलांतर सुरु

Abhijeet Khandekar

तावडे हॉटेलनजीक महामार्गावर कंटेनरला अपघात

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विश्वविक्रमवीर डाॅ. केदार साळूंखे ग्लोबल किड्स ॲचिव्हर्स अवॉर्ड 2020 या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Abhijeet Shinde

रामोशी बेरड समाजाचा आठ ऑक्टोबर पासून आंदोलनाचा इशारा

Abhijeet Shinde

चक दे कोल्हापूर…..मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचं रुप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!