Tarun Bharat

टेस्लाची लाँचिंग अगोदरच डिलिव्हरी

वृत्तसंस्था /नवी दिल्ली 

अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार बनविणारी कंपनी टेस्लाने वर्षाच्या सुरुवातीला भारतामध्ये कार आणण्याची घोषणा केली होती. या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर कंपनीने बेंगळूर येथे टेस्लाच्या मॉडेल 3 कारची डिलिव्हरी केली आहे. असे म्हटले जात आहे, की एलॉन मस्क यांची कंपनी भारतीय बाजारामध्ये आपले मॉडेल इलेक्ट्रिक कारला सर्वात अगोदर लाँच करणार आहे.

टेस्ला मॉडेल 3 चे बेस मॉडेल एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 423 किलोमीटरचे अंतर कापणार असल्याची माहिती आहे. सदरची कार ही 6 सेकंदामध्ये 0 ते 100 किलोमीटर इतके अंतर प्रति तासाच्या वेगाने पूर्ण करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

संपूर्ण उत्पादन भारतात

सीबीयू रुट मॉडेल 3 टेस्ला सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. भारतीय बाजारात मॉडेल 3 ला टेस्ला पहिली कार्यालयीन इलेक्ट्रिक कारच्या रुपाने बाजारात उतरवण्याची शक्यता आहे.

फोनच्या मदतीने नियंत्रण

या फिचर्सच्या मदतीने टेस्ला मॉडेल 3 मध्ये आपोआप अँडॉईड आणि आयओएसफोनवर टेस्ला मॉडेलचा तीन चावीच्या सहाय्याने वापर करता येणार आहे. यासोबतच फोनवर कायम सूचना देण्याची गरजही भासणार नाही. यामुळे कार आपोआप बंद सुरु करता येणार असल्याची माहिती आहे.

Related Stories

बलेनोची विक्रीत बल्ले बल्ले

Patil_p

हय़ुंडाईच्या कार विक्रीत 3 टक्के वाढ

Patil_p

‘किया ईव्ही 6’चे बुकिंग सुरु

Amit Kulkarni

BMW ची ‘ग्रॅन कुपे’, ‘एम 8 कुपे’ भारतात लॉन्च

datta jadhav

डस्टरची होणार भारतातून एक्झिट

Amit Kulkarni

इनोव्हा क्रिस्टाचे बुकिंग सुरु

Patil_p