Tarun Bharat

टेस्लाने विकल्या 70 हजार गाड्य़ा

डिसेंबरमध्ये पहिल्यांदाच विक्रमी विक्री : 245 गाडय़ांची निर्यात

वृत्तसंस्था/ टेक्सास

जागतिक स्तरावरचा दिग्गज उद्योजक एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने डिसेंबरमध्ये 70 हजार 847 इतक्मया मेड इन चायना मोटारींच्या विक्रीचा पराक्रम साध्य केला आहे.

2019 मध्ये शांघाईत वाहनांची निर्मिती करायला सुरुवात केल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये इतक्मया मोठय़ा संख्येने विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे टेस्लाने म्हटले आहे.  कंपनीच्या एकंदर कामगिरीबाबत आपण समाधानी असल्याचे टेस्लाने म्हणत आता आणखी दमदार कामगिरी करायची असल्याचे सुतोवाच केले आहे. 

गाडय़ांच्या निर्यातीला चालना

टेस्लाच्या संपूर्णपणे चिनी बनावटीच्या मोटारी डिसेंबरमध्ये वरीलप्रमाणे विकल्या गेल्या आहेत. यामध्ये 245 गाडय़ांची निर्यातीचाही समावेश आहे, जी मागच्या वर्षाच्या समान महिन्याच्या तुलनेमध्ये तीन पट अधिक आहे. निर्यातीत आणखी गती प्राप्त करण्यासाठी येणाऱया काळात टेस्लाचा प्रयत्न असेल, हे नक्की.

एकूण विक्री 4 लाखावर

टेस्लाने कोरोनाच्या काळातही संघर्ष करत कार विक्रीवर जास्तीत जास्त भर दिला. दुसरी लाट असतानाही टेस्ला कंपनीने मागच्या वषी एकूण 4 लाख 73 हजार मोटारींची विक्री केली आहे. ही बाब कंपनीच्या एकंदर व्यवसायाच्याबाबतीत पाहता स्पृहणीय नक्कीच आहे. महत्त्वाचे म्हणजे टेस्लाचा कार निर्मिती कारखाना स्वयंपूर्ण आहे. म्हणजेच कारसाठी निर्मितीवेळी कोणत्या गोष्टीसाठी अडून राहावं लागत नाही. आधुनिक तंत्रज्ञानासह कार निर्मिती करण्यावर कंपनीचे लक्ष असते.

Related Stories

अल्पबचत योजनांचे व्याजदर जैसे थे

Amit Kulkarni

बाधितांच्या संख्येत किंचित घट

datta jadhav

सलग नऊ आठवडे परकीय चलनात घट

Patil_p

शेतकऱयांचा शेतात मृत्यू झाल्यास 5 लाखांची मदत

prashant_c

बंदीपोरात दहशतवाद्यांच्या 3 मदतनीसांना अटक; शस्त्रसाठा जप्त

datta jadhav

महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री घेणार अमित शहांची भेट

Abhijeet Khandekar