Tarun Bharat

टॉप 5 कंपन्यांमध्ये बायोकॉनचा समावेश

नवी दिल्ली

 बायोकॉन कंपनीने आघाडीवरच्या 5 बायोटेक कंपन्यांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. अमेरिकेतील विज्ञान संबंधित सायन्स करियर्सने टॉप-20 ची वार्षिक यादी नुकतीच घोषित केली असून त्यात बायोकॉनने पाचवे स्थान मिळवले आहे.  2019 बायोकॉनने यादीत सहावे स्थान प्राप्त केले होते. या तुलनेत यंदा पाचव्या स्थानावर आल्यामुळे चांगली सुधारणा केली आहे, हे यावरून दिसून येते. 2018 मध्ये सातव्या स्थानावर कंपनी होती. 3 मार्च ते 3 मे दरम्यान जगभरातील 7 हजार 600 जणांची मते जाणून घेऊन यादी तयार करण्यात आली होती. रँकिंगमधील सुधारणा आशादायक आहेत.

कोरोना महामारीच्या काळात कंपनीने निर्मिती, दर्जा आणि पुरवठा या तिन्ही स्तरावर उत्तम कार्य केले आहे, असे मत बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार शॉ यांनी मांडले आहे. या रँकिंगमध्ये अन्य 4 कंपन्यांमध्ये रेजेनेरॉन, एलिनलैम, इनसाइट व सिंजेंटा यांचा समावेश आहे.

Related Stories

वेदांताचा 17.50 रुपये प्रतिसमभाग तिसरा लाभांश जाहीर

Patil_p

म्युच्युअल फंडांनी वर्षभरात दिला उत्तम परतावा

Patil_p

विमान वाहतूक 60 टक्केपर्यंत पोहचली

Patil_p

‘एनएसई’ ट्रेडिंग थांबल्याचा घेणार शोध

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये पुन्हा परतली तेजी

Patil_p

आशियाई अर्थव्यवस्थेत भारताचा डंका, तिसऱया क्रमांकावर

Patil_p