Tarun Bharat

टॉम क्रूजसोबत दिसणार प्रभास

Advertisements

मिशन इम्पॉसिबल 7 मध्ये लागणार वर्णी

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने अत्यंत कमी काळात भारतीय चित्रपटसृष्टीवर स्वतःची छाप निर्माण केली आहे. प्रभासने बाहुबली चित्रपटाद्वारे देशाच्या कानाकोपऱयात स्वतःचे चाहते निर्माण केले आहेत. बॉलिवूडमध्येही अभिनेत्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये पदार्पणाची अभिनेता तयारी करत आहे.s

हॉलिवूड चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास दिसून येऊ शकतो. सुपरहिट प्रेंचाइजी ‘मिशन इम्पॉसिबल’च्या दोन चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले क्रिस्टोफर मॅकक्वेरी यांनी सातव्या भागासाठी प्रभासशी संपर्क साधल्याचे समजते. इटलीत ‘राधे श्याम’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान प्रभास आणि मॅकक्वेरी यांची भेट झाल्याची चर्चा आहे.

प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तसेच तो ‘आदिपुरुष’ आणि ‘सलार’ चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. त्यानंतर दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या चित्रपटात दीपिका पदूकोनसोबत प्रभास मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील असणार आहेत.

Related Stories

झी मराठीवर अनोखी प्रेमकथा मन झालं बाजिंद

Patil_p

ब्रूस ली-चॅकी जेनच्या पंक्तीत विद्युत जामवाल

Patil_p

ब्रह्मास्त्र’नंतर रणवीर-आलियाचा विवाह?

Patil_p

नऊ महिन्यांनंतर वाजणार तिसरी घंटा

Patil_p

26 जानेवारीला झळकणार ‘अटॅक’

Patil_p

वरुण धवनला सलमान खानला OTT वर पाहायचे नाही, हे आहे मोठे कारण

Archana Banage
error: Content is protected !!