Tarun Bharat

टोकियो ऑलिंपिकमध्ये बजरंगला कांस्यपदक

Advertisements

वृत्तसंस्था/ चिबा

भारताचा आंतरराष्ट्रीय मल्ल बजरंग पुनियाने शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेत भारताने कुस्ती या क्रीडाप्रकारात एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदकांची कमाई करत नवा विक्रम नोंदविला.

शनिवारी झालेल्या कास्यपदकासाठी लढतीत 27 वर्षीय बजरंग पुनियाने कझाकस्तानचा मल्ल डेयुलेट नियाझबेकोव्हचा 8-0 अशा गुणफरकाने एकतर्फी दणदणीत पराभव केला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत  सुरूवातीपासूनच भारतीय मल्लांकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जात होत्या. त्याची पूर्तता भारतीय मल्लानी केल्याने भारतीय कुस्ती क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 2019 साली झालेल्या विश्व कुस्ती स्पर्धेत कझाकस्तानच्या नियाझबेकोव्हने उपांत्य फेरीत बजरंग पुनियाला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड बजरंगने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत निर्विवादपणे केली. भारताचा मल्ल रवि दाहीयाने 57 किलो वजनगटात रौप्यपदक मिळविले होते. 2012 च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या सुशीलकुमारने रौप्यपदक तर योगेश्वरदत्तने कांस्यपदक मिळविले होते.

शनिवारच्या कास्यपदकासाठी लढतीत कझाकस्तानचा मल्ल नियाझबेकोव्ह याने केवळ नकारात्मक खेळावर भर दिल्याने बजरंगला पहिला गुण मिळाला. त्यानंतर बजरंगने नियाझबेकोव्हचा उजवा पाय पकडण्यासाठी प्रयत्न करीत असताना नियाझबेकोव्हने बचावत्मक पवित्रा घेत बजरंगचे डोके पकडण्याचा प्रयत्न केला. या पकडीतून बजरंगने स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर बजरंगने आपल्या प्रतिस्पर्ध्यांला पुन्हा ढकलत एक गुण मिळविला. या लढतीतील पहिला विश्रांतीअखेर बजरंगने 2-0 अशी आघाडी मिळविली होती. बजरंगने आक्रमक डावावर अधिक भर दिला आणि त्याने नियाझबेकोव्हला आपल्या पकडीत अचूक धरले आणि 4 गुण मिळविले. बजरंग यावेळी 6-0 अशा गुणांनी आघाडीवर होते. बजरंगने नियाझबेकोव्हला खाली घेत आणखी दोन गुण मिळविले. शेवटी कझाकस्तानच्या मल्लाला ही लढत एकतर्फी गमवावी लागली. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बजरंग पुनियाने पहिल्या लढतीत किर्जिस्तानच्या अकेमाटेलीव्हचा तर त्यानंतर इराणच्या चेका घीसीचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती पण अझरबेजानच्या ऍलिव्हकडून बजरंगला शुक्रवारी उपांत्य लढतीत पराभव पत्करावा लागला होता. 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने सहा पदकांची कमाई केली होती.

Related Stories

एल्गार, बवुमा यांची अर्धशतके

Patil_p

लखनौ सुपर जायंट्सचा चौथा विजय

Patil_p

इटालियन ओपनमध्ये नदाल पुनरागमन करणार

Patil_p

बोपण्णा-रामकुमार, सानिया मिर्झा उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

बंदी संपणाऱया ऍथलिटस्ना ऑलिम्पिकची अनपेक्षित संधी

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये भारताचे दीपक काब्रा पहिले जिम्नॅस्टिक पंच

Patil_p
error: Content is protected !!