Tarun Bharat

टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून उत्तर कोरियाची माघार

वृत्तसंस्था/ सेऊल

येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान जपानमध्ये होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून उत्तर कोरियाने कोरोना महामारी समस्येमुळे माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. उत्तर कोरियाच्या क्रीडामंत्रालयाने 25 मार्च रोजी घेतलेल्या राष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला होता.

सध्या संपूर्ण शहरामध्ये कोरोनाची दुसरी लाट झपाटय़ाने पसरत असल्याने विश्व आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान उत्तर कोरियाने या महामारीपासून कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय ठामपणे घेतला आहे. या निर्णयामुळे आता उत्तर कोरिया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणार नाही. उत्तर कोरियाच्या या निर्णयाबाबत दक्षिण कोरियाच्या मंत्रालयाने दिलगिरी व्यक्त केली आहे. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील राजकीय संबंध सुधारण्याची संधी टोकियो ऑलिंपिकने उपलब्ध करून दिली होती. उत्तर कोरियाच्या या निर्णयाबाबत जपानच्या महिला मंत्री तेमायो मेरूकेवा यांच्याकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही.

2018 च्या दक्षिण कोरियात झालेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत उत्तर कोरियाने 22 खेळाडूंचे पथक पाठविले होते. या स्पर्धेमध्ये दक्षिण आणि उत्तर कोरियाच्या क्रीडा पथकानी एकत्रितपणे उद्घाटन समारंभवेळी झालेल्या खेळाडूंच्या संचलनात आपला सहभाग दर्शविला होता. उत्तर कोरियाचा देश कोरोना महामारीपासून झपाटय़ाने सावरत असल्याचे दिसून येते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करणार असल्याची माहिती जपानचे पंतप्रधान सुगा यांनी यापूर्वीच दिली होती. उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने ती अधिक नाजूक होवू नये यासाठी उत्तर कोरियाचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Stories

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी मालिकाविजय

Omkar B

न्यूझीलंडचा बांगलादेशवर एकतर्फी विजय

Patil_p

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीसाठी भारतीय संघ रवाना

Patil_p

इमाम उल हकचे नाबाद शतक, पाक 1 बाद 245

Patil_p

आयपीएल नियोजित रुपरेषेप्रमाणेच होईल – गांगुली

Patil_p

जपानचा भारतावर एकतर्फी विजय

Amit Kulkarni