Tarun Bharat

टोलनाक्यांवर नववर्षात प्री-पेड कार्ड सुविधा

फास्टॅग नसल्यास ‘टेन्शन’ नाही :

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

टोलनाक्यांवर सर्व कॅश लेन (रोख स्वरुपात शुल्क स्वीकारणाऱया दालनांच्या मार्गिका) 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग लेनमध्ये बदलण्यात येणार आहेत, याचमुळे 1 जानेवारीपासून टोलनाक्यांवर रोख स्वरुपात शुल्क भरता येणार नाही. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) टोलनाक्यांवर प्री-प्रेड टच अँड गो कार्ड सादर करणार आहे.

एनएचएआयच्या अधिकाऱयांनुसार टोलनाक्यांवरील गर्दी रोखण्यासाठी नव्यावर्षात सर्व हायब्रिड मार्गिकांवर प्री-पेड कार्ड सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ज्या वाहनांवर फास्टॅग नाही, ते टोलनाक्यांवर पॉइंट ऑफ सेल्समधून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकतात. फास्टॅगऐवजी या कार्डांचा वापर केल्यास त्यांच्याकडून दुप्पट रक्कम घेतली जाणार नाही. फास्टॅगधारकही या कार्डांचा वापर करू शकतात. त्यांचा फास्टॅग काळय़ा यादीत किंवा बंद पडले असल्यास किंवा रिचार्ज करण्याचा विसर पडल्यास प्री-प्रेड कार्डचा वापर करता येणार आहे.

टोलनाक्यांवर दोन पॉइंट-ऑफ-सेल्स अधिकाऱयांनुसार भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिडेटने (आयएचएमसीएल) निविदा मागवून ही प्रणाली लवकरात लवकर सादर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. प्री-पेड कार्डची खरेदी आणि रिचार्जसाठी प्रत्येक राष्ट्रीय महामार्गाच्या टोलनाक्यांवर दोन पॉइंट-ऑफ-सेल्स स्थापन करण्यात येणार आहेत. प्री-पेड कार्ड खरेदी केल्यावर ग्राहक इंटरनेट बँकिंग किंवा पीओएसवरही रिचार्ज करू शकतात. सद्यकाळात प्रत्येक टोलनाक्यावर रोख शुल्क आकारणीसाठी दोन मार्गिका ठेवण्यात आल्या आहेत, परंतु 1 जानेवारीपासून त्याही बंद करण्यात येणार आहेत.

Related Stories

बिहार विधान परिषदेवर जाणार शहनवाझ हुसैन

Patil_p

शबरीमला निदर्शनांशी संबंधित गुन्हे मागे घेणार

Amit Kulkarni

‘ताज’मधील युएनएससी बैठकीत पाकिस्तानचा पर्दाफाश

Patil_p

अरविंद सावंत यांनी उठविला सीमाप्रश्नावर लोकसभेत आवाज

Patil_p

पन्नीरसेल्वम यांना पलानिसामी गटाचा विरोध

Patil_p

काशी विश्वनाथ मार्गिकेचे आज उद्घाटन

Patil_p