Tarun Bharat

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यु

Advertisements

करमाळा प्रतिनिधी

सोलापूर-अहमदनगर राज्यमार्गावरील रस्त्यावर करमाळा तालुक्यातील मांगी टोल नाक्याजवळ एका ट्रक चालकाने मोटारसायकलस्वारास पाठीमागून जोरात धडक दिली. यात ३५ वर्षाचा युवक जागीच ठार झाला आहे. हि घटना आज ( ता.२९) सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

यात हकीकत अशी कि, वसंत मारुती शिंदे (वय- ३५), रा. देवळाली (ता. करमाळा) हा करमाळा वरुन आपल्या मोटारसायकल क्रमांक ( MH.45.AN.3064) मांगीकडे जात असताना पाठीमागून एक माल ट्रक क्रमांक (TN.52.L.9065) हा आला व समोर मांगी टोल नाक्यापासून पुढे पुलावर खड्डे असल्याने उभा असलेल्या वसंत मारुती शिंदे यास जोराची धडक दिली. यात वसंत शिंदे यास डोक्याला मार लागल्याने तो जागीच ठार झाला आहे.

घटनास्थळी पोलिसांनी तातडीने येवून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. वसंत शिंदे हा वैद समाजाचा असल्याने या घटनास्थळी वैद समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यांना तातडीने हस्तक्षेप करून ट्रक ड्रायव्हरला करमाळा पोलीस स्टेशनला पाठवले. मयत शिंदे यास पोलिसांनी पुढील प्रक्रियेसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

‘शांतता बिघडवण्याचा ठेका मनसेने भाजपकडून घेतलाय’ : संजय राउत

Abhijeet Khandekar

दहावी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नये

Sumit Tambekar

बायडेन यांचा 20 जानेवारीला शपथविधी

datta jadhav

सातारचे नवे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात कोरोनाने एकाचा मृत्यू, 20 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

सोलापूर शहरात तब्बल 126 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, 6 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!