Tarun Bharat

ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; 4 जखमी

Advertisements

 ऑनलाईन टीम / वसई :

भरधाव वेगातील ट्रकने रस्त्यावर झोपलेल्या पादचाऱयांना चिरडल्याची घटना सोमवारी रात्री वसईजवळ घडले. या दुर्घटनेत एका पादचाऱयाचा मृत्यू झाला आहे. तर 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक वसईकडे निघाला होता. ट्रक चालकाने मद्यप्राशन केल्यामुळे त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याशेजारच्या कठडय़ाला धडकला. त्यावेळी कठडय़ावर झोपलेले पाच जण चिरडले गेले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात फळांच्या गाडय़ांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. दुर्घटनेनंतर स्थानिकांनी ट्रक चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.  

Related Stories

उद्धव ठाकरेंना मत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीला मत

datta jadhav

Kolhapur- शाहूंचे विचार विशेष उपक्रमातून जगभरात पोहचवा

Abhijeet Khandekar

रस्त्यावरचा शिवसैनिक! संजय पवार आहेत तरी कोण?….

Rahul Gadkar

संजय ताकसांडे महावितरणच्या संचालक पदी रुजू

Tousif Mujawar

… नाहीतर 2024 मध्ये शिवसेनेचे मोठे नुकसान होणार : रामदास आठवले

Tousif Mujawar

राज्यातील विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी बिगुल वाजले

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!