Tarun Bharat

ट्रकमधून 2360 किलो गांजा जप्त; 2 तस्कर अटकेत

ऑनलाईन टीम / दिसपूर :

आसामच्या करीमगंज जिल्ह्यात पोलिसांनी एका ट्रकमधून तब्बल 2360 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन गांजा तस्करांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

करीमगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करीमगंज जिल्ह्यातील त्रिपुराच्या आंतरराज्यीय सीमेजवळ चेकपोस्टवर संशय आल्याने पोलिसांनी ट्रकचालकाची कसून चौकशी करत ट्रकची झडती घेतली. यावेळी ट्रकमधून गांजाची वाहतूक होत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या ट्रकमधून 2360 किलो गांजा जप्त करत दोन गांजा तस्करांनाही अटक केली आहे.

ट्रकमधील एवढय़ा मोठय़ा प्रमाणातील गांजा नेमका कुठून आला होता आणि तो कुठे पोहचणार होता, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या कारवाईबद्दल आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनीही पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Related Stories

कोल्हापूर : जिल्हा परिषद उपाध्यक्षांना कोरोनाची लागण, 31 नवे पॉझिटिव्ह

Archana Banage

केंद्रापेक्षा लोक राज्य सरकारांवर अधिक नाराज

Amit Kulkarni

केंद्रीय मंत्री बांगलादेशी, तृणमूलचा दावा

Patil_p

‘आप’ मंत्र्याशी संबंधित मालमत्ता जप्त

Patil_p

”काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

Archana Banage

जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांवर विश्वास शिवसेनेलाही बळ

Archana Banage