Tarun Bharat

ट्रक्टर घरात घुसला; दोघे जखमी विडणीनजिक दुर्घटना

Advertisements

प्रतिनिधी/ फलटण

आळंदी- पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर विडणी गावच्या हद्दीत अब्दागिरेवाडीजवळ दोन ट्रक्टर समोरासमोर होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात महामार्गालगत असलेल्या घरात एक ट्रक्टर घराची भिंत तोडून घरात घुसला. या दुर्घटनेत ट्रक्टर चालक व अन्य एकजण असे दोघे जखमी झाले आहेत. सुदैवाने घरातील लोक घराबाहेर असल्याने मोठी दुर्घटना टळली.

    फलटणहून पिंपरदकडे जाणारा ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रक्टर (बिगर पासिंग नंबर ) तर माळशिरसहून फलटणकडे खत वाहतूक करणारा मोकळा ट्रक्टर नंबर एम एच 13 ए.जे.5324 यांची आळंदी पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर भरधाव वेगात चालले असताना बुधवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास विडणी हद्दीतील अब्दागिरेवाडीजवळ समोरासमोर होणारी धडक चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रक्टर चालकाचे ट्रक्टरवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत असलेल्या घरात एक ट्रक्टर घराची भिंत तोडून घरात घुसला टॅक्टर चालक गुणवंत गोरे यास डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे तर कैलास लवटे जखमी झाला असून दोघेजण जखमी आहेत. ऊस वाहतुक करणारा ट्रक्टर चालक ट्रक्टर सोडून पळून गेला आहे.

  घटनास्थळी आसपासच्या लोकांनी धाव घेऊन जखमी ट्रक चालकास व अन्य एकजण जखमीस फलटणहून रुग्णवाहिका बोलावून शासकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठविले आहे. या घटनेची खबर विडणीच्या पोलीस पाटील सौ. शितल नेरकर यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खबर दिल्यावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळी पाहणी करुन अपघाताची लोकांकडून माहिती घेत होते.

Related Stories

कास परिसरातले लोक जगले पाहिजेत

datta jadhav

केंद्राने महाराष्ट्रावर कुरघोड्यांचे राजकारण करू नये

datta jadhav

पाटण मतदारसंघातून ७१ हजार सेना सदस्य नोंदणी पूर्ण

Abhijeet Shinde

साताऱयात आदेश उल्लंघन करणाऱया 27 जणांवर गुन्हे

Patil_p

थकित वेतनासाठी आशा व गटप्रवर्तकांचे आंदोलन

datta jadhav

वाईतील मिसींग तक्रारीच्या अनुषंगाने तपास

Patil_p
error: Content is protected !!