Tarun Bharat

ट्रक खरेदी व्यवहारात फसवणूक

प्रतिनिधी/ कोल्हापूर

ट्रक खरेदीच्या व्यवहारात केवळ 55 हजार रुपये रोख देऊन अन्य रक्कम न देता ट्रक घेऊन पसार झालेल्याविरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजीम सलीम पठाण (रा. रहिमतपूर, ता कोरेगाव. जि. सातारा) याने बनावट नावाद्वारे फसवणूक केल्याची फिर्याद आहे. विजय हिंदूराव पाटील (वय 61, रा. विठृलनगर, शहापूर, इचलकरंजी) यांनी फिर्याद दिली आहे.

  याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, विजय पाटील यांनी ट्रक विक्रीस काढून सोशल मीडियावर विक्रीची जाहिरात दिली होती.

  जाहिरात पाहून साताऱयाच्या समीर शेखने (बनावट नाव) त्यांच्याशी संपर्क साधला. 2 सप्टेंबर रोजी तो कोल्हापुरात येऊन मध्यवर्ती बसस्थानक परिसरात त्यांच्यामध्ये ट्रकचा व्यवहार होऊन संचकारपत्र झाले. 55 हजार घेऊन उर्वरित रक्कम महिन्यात भरुन फायनान्स कंपनीचे अकौंट बंद करण्याचे आश्वासन शेखने दिले. काही दिवसाने पाटील यांनी शेखने दिलेल्या 9112724724 या क्रमांकावर फोन केला. पण फोन बंद होता. यामुळे पाटील यांनी शेख याने दिलेल्या सातारा येथील पत्यावर जाऊन चौकशी केली असता त्या नावाची व्यक्तीच नसल्याचे कळाले. दरम्यान, 19 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्धीमाध्यमात ट्रकच्या अपहाराचे वृत्त फोटोसह आले. हे वृत्त पाटील यांच्या वाचनात आल्यावर त्यांनी फोटो पाहून पोलिसात धाव घेतली. तसेच समीर शेख नावाची व्यक्ती नसून त्याचे खरे नाव अजीम सलीम पठाण असल्याचे समजले. व त्यानेच आपली फसवणूक केल्याची फिर्याद पाटील यांनी गुरुवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक
श्रीकृष्ण कटकधोंड या गुन्हय़ाचा तपास करत आहेत.

Related Stories

सहकारी संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदतीसाठी पुढे यावे : बाळासाहेब पाटील

Archana Banage

कृषी विभाग निशाण्यावर

Patil_p

कर्तबगार माजी नगराध्यक्षा मुक्ता लेवे

datta jadhav

‘या’ योजनेतून होणार मोफत उपचार; शुल्क आकारल्यास 5 पट दंड : राजेश टोपे

Tousif Mujawar

ब्राझीलमधील डेफ ऑलिम्पिकसाठी सातारची प्रांजली रवाना

Patil_p

कोल्हापूर : कोरोना नसेल तरच जिल्ह्यात प्रवेशाचा आदेश रद्द : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Archana Banage