Tarun Bharat

ट्रम्प यांच्यावरील वादग्रस्त पुस्तकाच्या विक्रीला न्यायालयाची परवानगी

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

प्रकाशनाआधीच वादग्रस्त ठरलेल्या ‘टू मच एंड नेवर इनफ हाउ माय फैमिली क्रिएट द वर्ल्ड मोस्ट डेंजरस मैन’ या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील पुस्तकाच्या प्रचाराला आणि विक्रीला अमेरिकेच्या न्यायालयाने परवानगी दिली आहे.

ट्रम्प यांची पुतणी मेरी ट्रम्प यांनी हे पुस्तक लिहिले आहे. मेरी या साईकोलाजिस्ट असून, त्यांनी पुस्तकात ‘डोनाल्ड यांनी कॉलेज प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सेट परिक्षेसाठी पैसे देऊन डमी उमेदवार बसवला होता. त्यामुळेच त्यांचा प्रतिष्ठित कॉलेजमध्ये प्रवेश होऊ शकला, असा दावा केला आहे. तसेच ट्रम्प हे एका तीन वर्षाच्या मुलाप्रमाणे आहेत. नेहमी ते आपलाच घोडा दामटत असतात, असेही मेरी यांनी म्हटले आहे. 

हे पुस्तक डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्रपतीपदाच्या दावेदारीवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या भावाने या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध दर्शवला होता. त्यानंतर मेरी ट्रम्प यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्यावर न्यायालयाने या पुस्तकाच्या बऱ्याच प्रति वाचकांच्या हातात पडल्या आहेत, त्यामुळे आता यावर बंदी घालणे योग्य ठरणार नसल्याचे न्यूयॉर्कच्या पुफेकीसी स्टेट सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती हॉल बी ग्रीनवल्ड यांनी म्हटले आहे.

Related Stories

भारतीय महिला संयुक्त राष्ट्र महासचिवपदाच्या शर्यतीत

Patil_p

लस तयार होईपर्यंत कोरोनाचा प्रकोप

Patil_p

गडहिंग्लज कारखान्याच्या १२ संचालकांचे राजीनामे

Archana Banage

सातारा : राष्ट्रवादी कार्यालयावर अज्ञातांकडून दगड फेक

Archana Banage

लसीकरण करण्याआधीच दुसऱ्या देशांना लस पाठवली ; केंद्र सरकारच्या निर्णयावर अजित पवार संतापले

Archana Banage

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Archana Banage
error: Content is protected !!