Tarun Bharat

ट्रम्प यांना दिलेल्या औषधाचा व्यापक उपयोग केला जाणार

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना बरा करण्यासाठी ज्या औषधांचा उपयोग करण्यात आला होता, ती औषधे आता व्यापक प्रमाणात वितरीत करण्याची अमेरिकेची योजना आहे. या औषधांचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोना संदर्भसूचीत केला आहे. त्यांचा उपयोग सौम्य किंवा तीव्र स्वरुपातील कोरोनावर केला जाऊ शकतो.

भारतातही या औषधांना रोनाप्रेव्ह या नावाखाली ‘निर्बंधित उपयोग’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आता जागतिक आरोग्य संघटनेने त्यांना मान्यता दिल्याने या औषधांची मागणी वाढणार अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.  मॅक्स हेल्थकेअर, अपोलो, मॅक्स फोर्टीस आणि सर गंगाराम रुग्णालय इत्यादी रुग्णालयांमध्ये ही औsषधे दिली जातात. मात्र ती महाग आहेत. ही औषधे मोनोक्लोनल अँटिबॉडीज म्हणून ओळखली जातात. कॅसिरिव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या नावानेही ती लोकांना माहीत आहेत. त्यांचा विकास अमेरिकेतील रिजनरॉन या कंपनीने केला आहे. ती कोरोनावर अत्यंत प्रभावी मानली गेली असली तरी त्यांना फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. त्यांच्या साईड इफेक्टस् वर अद्याप संशोधन सुरु आहे. आतापर्यंत ती उच्च धोका असणाऱया पण सौम्य लक्षणे दिसणाऱया कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणली गेली आहेत.

Related Stories

डोअर-टू-डोअर लसीकरणास ‘सर्वोच्च’ नकार

Patil_p

प्रभावी शिक्षणासाठी ‘निपुण भारत’ योजना सुरू

Patil_p

व्यापाऱयांचा ‘बंद’ संमिश्र; ठिकठिकाणी चक्काजाम

Patil_p

पुण्याच्या भरवस्तीत थरारनाटय़ानंतर गवा जेरबंद

Omkar B

अक्षरधाम हल्ल्यावर येतोय चित्रपट

Patil_p

कुमार विश्वास यांच्यावर एफआयआर

Patil_p