Tarun Bharat

ट्रान्सफॉर्मरखाली कचरा टाकणे धोक्याचे

दुर्घटना घडल्यानंतरच नागरिक-मनपाला जाग येणार का?

प्रतिनिधी /बेळगाव

शहर व उपनगरांमध्ये कचऱयाची समस्या दिवसेंदिवस भीषण रूप घेत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरखाली असणाऱया खुल्या जागेत कचरा फेकला जात आहे. या कचऱयातील अन्नपदार्थ खाण्यासाठी भटकी जनावरे गोळा होत आहेत. बऱयाच ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जमिनीलगत असल्याने जनावरांना विजेचा धक्का बसून अपघात घडण्याची शक्मयता असते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नागरिकांनी कचरा टाकणे बंद करणे आवश्यक आहे.

खडेबाजार येथील मोनाप्पा पानशॉप शेजारी ट्रान्सफॉर्मरखाली कचरा टाकला जात आहे. या ट्रान्सफॉर्मरमधून उच्चदाबाच्या भूमिगत विद्युतवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. कचऱयामध्ये बऱयाचवेळा अन्नपदार्थ व भाजी टाकली जाते. यामुळे त्या ठिकाणी जनावरे येत असून भूमिगत विद्युतवाहिन्यांना स्पर्श करीत आहेत. जनावरांकडून विद्युतवाहिन्या कुरतडण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे विद्युतवाहिनीचा धक्का लागून जनावरे दगावण्याची शक्मयता आहे. असाच प्रकार फोर्ट रोड येथील मॅजिस्टीक हॉटेलच्या समोरील ट्रान्सफॉर्मरखाली होत आहे.

कचऱयाची उचल वेळीच झाली नाही तर आजूबाजूचे नागरिक या कचऱयाला आग लावत आहेत. परंतु यामुळे विद्युतवाहिनीला धोका पोहोचून संपूर्ण ट्रान्सफॉर्मर जळण्याची शक्मयता असते. असे घडल्यास ट्रान्सफॉर्मरसोबत आजूबाजूची दुकाने व घरांनाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे महानगरपालिकेनेही ट्रान्सफॉर्मरखाली कचरा टाकणाऱयांवर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.

ट्रान्सफॉर्मरखाली कचरा टाकणे बंद करा

शहरात अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तसेच विद्युतखांबाखाली कचरा टाकला जात आहे. काहीवेळा भटकी जनावरे कचऱयातील अन्नपदार्थ खाण्यासाठी येतात. त्यांना विजेचा धक्का लागण्याची शक्मयता असते. तसेच कचरा जाळला जात असल्याने ट्रान्सफॉर्मर पेट घेण्याची शक्मयता आहे. एखादी दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी नागरिकांनी ट्रान्सफॉर्मरखाली कचरा टाकणे बंद करावे.

– अरविंद गदगकर (साहाय्यक कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)

Related Stories

काळी नदीवरील कदा धरणाचे आठ दरवाजे उघडले

Omkar B

बाजारात हिरवा वाटाणा-हरभरा दाखल

Amit Kulkarni

शहापूर येथील पी.के.क्वॉर्टर्सची पुन्हा उभारणी करा

Patil_p

पशुसंगोपन खात्यात लवकरच नियुक्त्या

Patil_p

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा!

Amit Kulkarni

कचेरी गल्ली गणपती मंदिरात गणहोम

Patil_p