आवळा हा चवीला तुरट जरी असला तरी आरोग्यासाठी तो अत्यंत लाभदायक आहे. त्यातील औषधी गुणधर्मामुळे अनेक रोगांवर तो प्रभावी ठरतो. पण तुरट आवळा तास खाल्ला जात नाही तसेच बाकी फळांप्रमाणे हे फळ जास्त दिवस टिकत नसल्यामुळे यापासून आवळासुपारी,आवळा कँडी, आवळा पावडर असे बरेच पदार्थ तयार करून वर्षभरासाठी साठवले जातात.आज आपण आवळ्याचे लोणचे कसे करायचे हे पाहणार आहोत.
साहित्य
पाव किलो – आवळे (पातळ आणि उभ्या फोडी करून)
मोहरी – पाव वाटी
फोडणीसाठी तेल – अर्धी वाटी
काळी मोहरी – पाव चमचा
हिंग – अर्धा चमचा
हळद – अर्धा चमचा
मेथी दाणे – अर्धा चमचा
मीठ
हिरव्या मिरच्यांचे तुकडे साधारण पाव वाटी
कृती
प्रथम छोट्या कढईत मेथ्या किंचीत तेलावर तळून घेऊन बाजूला ठेवा.तेल गरम तेलात मोहरी, हिंग आणि हळद मीठ घालून फोडणी करून ठेवा.
आवळे स्वच्छ धुवून त्याच्या अगदी पातळ आणि उभ्या फोडी करून घ्या. त्यावर लगेच मीठ घालून चांगले एकत्र करून घ्या, नाहीतर आवळे काळे पडतील.
यांनतर हिरव्या मिरचीचे तुकडे वाटून घेऊन आवळ्याच्या फोडींबरोबर एकत्र कालवून ठेवा.मिक्सरच्या छोट्या भांड्यात मोहरी आणि तळलेले मेथी दाणे घेऊन त्याची पावडर करून घ्या. मोहरी चांगली बारीक झाली पाहिजे. मग त्यात पाव वाटी पाणी घालून चांगले वाटून घ्या.आता ही बारीक केलेली मोहरी आवळ्याच्या तुकड्यांमध्ये घालून नीट एकजीव करून घ्या. एव्हाना करून ठेवलेली फोडणी थंड झाली असेल, तीही ह्या आवळ्यामधे घालून व्यवस्थित हलवून घ्या. चव घेऊन हवे असल्यास मीठाचे प्रमाण वाढवा.चविष्ट लोणचे तयार आहे.
हे लोणचे जास्त दिवस टिकत नसले तरी थंडीच्या दिवसात एक वेगळी चव चाखण्यासाठी आणि शरीराला पौष्टिक असणारं हे लोणचे ट्राय करायला काही हरकत नाही.


previous post