Tarun Bharat

ट्रीमिक्स रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच संशयकल्लोळ

सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याची रुंदी मोजली,
विकास आराखड्या प्रमाणे काम होत नसल्याची तक्रार, न्यायालयात जाण्याचा इशारा

प्रतिनिधी / मिरज

मिरज शहरातील स्टँड चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंत ट्रीमिक्स पद्धतीने रस्ता करण्यात येणार आहे. मात्र, हा रस्ता विकास आराखडा (डीपी) प्रमाणे होत नसल्याची तक्रार मिरज शहर सुधार समितीने केली आहे. सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातात मोजपट्टी घेऊन रस्त्याची रुंदी मोजली. यामुळे ट्रीमिक्स रस्ता कामास सुरुवात होण्याआधीच भ्रष्टाचाराचा संशयकल्लोळ माजला आहे.

सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी या ट्रीमिक्स रस्त्यांसाठी मंजूर आहे. मात्र विकास आराखड्या प्रमाणे काम होत नसल्याने हा निधी वाया जाणार असल्याचा आरोप सुधार समितीने केला आहे. सोमवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी या रस्त्याची मोजमाप केली. सध्या रस्ता 60 फुटीच वापरात असताना तेवढ्याच रस्त्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. हा रस्ता विकास आराखड्यामध्ये 80 फुटी असताना 60 फुटी का केला जात असल्याने सुधार समितीने हरकत घेतली आहे. एकदा हा रस्ता झाला तर पुन्हा 15 ते 20 वर्षे रस्ता होणार नसल्याने रस्ता विकास आराखडा प्रमाणे 80 फुटी रस्ता करावा, अशी मागणी करण्यात आली. याबाबत न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Stories

सरोजनी शिवाजीराव देशमुख यांचे निधन

Archana Banage

सांगली : धनगर समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ढोल बजाव सरकार जगाव’ आंदोलन (व्हिडिओ)

Archana Banage

जत येथे खत दुकान फोडून 22 लाखाचा माल लंपास

Abhijeet Khandekar

काळ्या कोळशातून फुलतो त्यांचा संसार ! ….

Archana Banage

सांगली : शिपूरमध्ये काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षावर हल्ला

Archana Banage

इस्लामपुरातील विकास कामांसाठी ३ कोटी ४५ लाखांचा निधी

Archana Banage