Tarun Bharat

ट्विंकल गांधी यांच्याकडून आयुर्वेदिक काढय़ाचे वाटप

प्रतिनिधी / बेळगाव

भाग्यनगर, पाचवा क्रॉस येथील गृहिणी ट्विंकल विरल गांधी यांनी मागील काही दिवसांपासून परिसरातील नागरिक व पोलिसांना मोफत आयुर्वेदिक काढय़ाचे वितरण सुरू केले आहे. हा काढा पूर्णपणे आयुर्वेदिक असून यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. दररोज 60 ते 70 नागरिकांना काढय़ाचे त्या वितरण करीत आहेत.

त्या मूळच्या गुजरात येथील असून, तेथेही त्यांनी स्वयंसेवी संस्था सुरू केली आहे. बेळगाव परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांनी या काढय़ाचे वितरण सुरू केले आहे. पुदिना, दालचिनी, लिंबू, चहा पावडर, तुळस, आले या सर्वांचा वापर करून हा काढा तयार केला जात आहे. दररोज 30 ते 40 पोलिसांना हा काढा पोहोचविण्याचे काम त्या करीत आहेत.

Related Stories

कलामंदिर व्यापारी संकुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

Amit Kulkarni

वीटभट्टी व्यवसाय नुकसानीत

Omkar B

चक्क स्ट्रेचरवरून दगडांची वाहतूक

Amit Kulkarni

चक्क गटारीमधून घातल्या विद्युत वाहिन्या

Patil_p

भवानी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पंचमुखी स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni

एपीएमसी रोडवरील ट्रान्स्फॉर्मर हटविण्याची मागणी

Amit Kulkarni