Tarun Bharat

ट्विटरच्या सहसंस्थापकांचं पराग अग्रवालांविषयी मोठं विधान

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डोर्से यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे. पराग अग्रवाल यांच्या नावाची घोषणा केल्यांनतर ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं आहे.

ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देताना पहिलं कारण पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती हे सांगितलंय. जॅक डॉर्सी यांनी सीईओ पदाचा राजीनामा देताना ३ प्रमुख कारणं सांगितली आहेत. या ३ पैकी पहिलं कारण नवनियुक्त पराग अग्रवाल यांची सीईओपदी नियुक्ती हे सांगितलंय. मात्र हे कारण त्यांनी पराग अग्रवाल यांच्या क्षमतांवरील विश्वास यामुळेच दिलंय. त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना देताना पराग अग्रवाल यांचं तोंड भरून कौतुक केलंय.

Related Stories

ओडिशा सरकारने 1 जूनपर्यंत वाढविले लॉकडाऊन!

Tousif Mujawar

अभिनेता सोनू सूद ‘आयकर’च्या रडारवर

Archana Banage

गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी शिवप्रेमी आक्रमक; स्वतंत्र महामंडळ स्थापनेची मागणी

Archana Banage

सार्वभौमत्व रक्षणासाठी कोणाचाही पराभव करू!

Patil_p

आशा वर्कर्सच्या मानधनात 2 हजार रुपयांची वाढ; अमित ठाकरे व अजित पवार भेट यशस्वी

Tousif Mujawar

ईईएसएलचे 1.6 कोटी स्मार्ट एलईडी दिवे लावण्याचे ध्येय

Patil_p