केंद्रीय मंत्र्यांचा स्वदेशी ऍप वापरण्याचा सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू’शी संलग्न होण्याची घोषणा केली आहे. दीर्घकाळापासून केंद्र सरकार मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरसोबत सरकारचा वाद सुरू असताना गोयल यांनी ही घोषणा केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकार ट्विटरचे स्वदेशी स्वरुप ‘कू’चा प्रचार करण्याचे काम करत असावे.


कू ऍप मागील वर्षी मार्च महिन्यात सादर करण्यात आले होते. यात भारतीय भाषांचा वापर करता येतो. कू ऍप मागील वर्षी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत ऍप स्पर्धेचा विजेता ठरला होता. हा ऍप वापरकर्त्याला टेक्स्ट, ऑडियो, व्हिडिओत संदेश प्रसारित करण्याचा पर्याय देतो. यात ट्विटरप्रमाणेच लोकांना फॉलो करता येते. हा ऍप हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तमिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, उडिया आणि आसामी भाषांना सपोर्ट करते. ट्विटरप्रमाणेच कू देखील वापरकर्त्याला डायरेक्ट मेसेजद्वारे चॅट करण्याची परवानगी देते.
कू वर स्वतःच्या कल्पना आणि विचार मांडुया असे गोयल यांनी म्हटले आहे. गोयल यांच्यासह कू मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर रविशंकर प्रसाद आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा तसेच अन्य राजकीय नेते आहेत.