Tarun Bharat

टय़ुनिशियाचा भारतावर निसटता विजय

वृत्तसंस्था/ दुबई

सध्या संयुक्त अरब अमिरातच्या दौऱयावर असलेल्या भारतीय महिला फुटबॉल संघाला सोमवारी खेळविण्यात आलेल्या दुसऱया मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात टय़ुनिशियाकडून पराभव पत्करावा लागला. टय़ुनिशियाने हा सामना 1-0 अशा गोलफरकाने जिंकला.

या सामन्यात टय़ुनिशियाचा एकमेव निर्णायक गोल आठव्या मिनिटाला फ्री कीकवर हेयुजीने केला. फिफाच्या मानांकनात भारत सध्या 57 व्या तर टय़ुनिशिया 77 व्या स्थानावर आहे. या दौऱयात भारतीय महिला फुटबॉल संघाने शनिवारी झालेल्या मित्रत्वाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात संयुक्त अरब अमिरातचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. येत्या जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान भारतात होणाऱया एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला फुटबॉल संघाकरिता सरावासाठी हा दौरा आयोजित केला आहे.

Related Stories

मुंबई इंडियन्सचे किरण मोरे कोरोनाबाधित

Patil_p

ब्रॅडबर्न, सकलेन मुश्ताक यांच्यावर नवी जबाबदारी

Patil_p

दिल्ली रणजी संघात यश धुलचा समावेश

Amit Kulkarni

आशियाई स्पर्धेसाठी आनंद भारतीय संघाचा मेंटर

Patil_p

दिल्ली 101 धावांनी पिछाडीवर

Patil_p

न्यूझीलंड इलेव्हन संघात रॉस टेलरचा समावेश

Patil_p