ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र मंत्री मंडळाने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता महाराष्ट्रात साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.


ते म्हणाले, ही पोलीस भरती ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण, तरुणींसाठी एक मोठी संधी असेल आणि लवकरच याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण तरुणींसाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे.