Tarun Bharat

ठाकरे सरकारकडून 2016 मधील ‘या’ मारहाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

ऑनलाईन टीम / मुंबई : 


माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला सामोरे जात असताना शिवसेनेने 2016 चा मुद्दा उकरून काढला आहे. 


भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकाला केलेल्या मारहाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. 2016 साली भाजपचे तत्कालिन आमदार असलेल्या उन्मेष पाटील यांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. मात्र त्याप्रकरणी तत्कालिन भाजप सरकारने कोणतीही कायदेशीर कारवाई केलेली नाही. याप्रकरणी निवदेन आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश गृहमंत्रालयाने दिले आहेत.


याबाबत अधिक माहिती देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, त्यावेळी भाजपचे सरकार असल्याने साधा एफआयआर देखील दाखल झाला नाही. 2019 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता मात्र, यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नव्हती. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. याबाबत आलेल्या निवेदनांनुसार आता पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आलेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


शिवसेनेने माजी नौदल सेना अधिकाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या कृत्यावर टीका केली तर भाजप कडून देखील सतत टीका होत आहे. मात्र आता खासदार उन्मेष पाटील यांनी 2016 मध्ये माजी सैनिकाला मारहाण केलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश निघाल्यामुळे भाजपची देखील कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Related Stories

मैत्रीदिन एकमेकांना शुभेच्छा देत साजरा

Patil_p

देगांव, निगडी एमआयडीसीचा मॅग्नेटिक महाराष्ट्र योजनेत समावेश करा- आ. शिवेंद्रसिंहराजे

Patil_p

वाई आगारात डिझेलचा तुटवडा

Patil_p

जिल्ह्यात आणखी 52 जण कोरोनामुक्त

Archana Banage

राज्यसभेसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर; तिसऱ्या जागेसाठी धनंजय महाडिकांच्या नावाची चर्चा

Archana Banage

वाढे सोसायटीत 60 लाखांचा अपहार

Patil_p