Tarun Bharat

ठाकरे सरकारचे ‘या’ मागणीसाठी रेल्वेला विनंती पत्र

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा ते सात महिन्यांपासून मुंबईतील बंद असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करावी यासाठी रेल्वेला विनंती पत्र लिहिले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात दिवसभरात तीन टप्प्यात सर्वांसाठी प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी केली आहे. या वर्गवारीमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सर्वसामान्य प्रवासी असे दोन विभाग करुन दोघांसाठी प्रवासाच्या वेळा आखल्या आहेत. 


यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीस पास किंवा तिकिटावर  सकाळी 7.30 ची पहिली लोकल, तसेच 11 ते 4.30 आणि रात्री 8 ते शेवटच्या लोकल पर्यंत प्रवासाची मुभा द्यावी. 


तर अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ज्यांच्याकडे अधिकृत कोड तसेच ओळखपत्र आणि अधिकृत तिकीट किंवा पास असणाऱ्यांना सकाळी 8 ते 10.30 आणि संध्याकाळी 5 ते 7.30 च्या दरम्यान प्रवासास मुभा द्यावी आणि याशिवाय प्रत्येक एका तासाने महिला विशेष लोकल असावी, अशी मागणी राज्य सरकारकडून रेल्वेकडे करण्यात आली आहे. 

Related Stories

यूपी सरकारच्या तपासावर आम्ही समाधानी नाही: सुप्रीम कोर्ट

Abhijeet Shinde

थोडी जरी लाज, हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि…, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान

Abhijeet Shinde

काळ्या, पांढऱ्या बुरशीनंतर आता पिवळ्या बुरशीचा धोका; उत्तर प्रदेशात सापडला पहिला रुग्ण

Abhijeet Shinde

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर हजर राहणार – अनिल देशमुख

Abhijeet Shinde

‘मोठी जबाबदारी, ती पार पाडायला आवडेल’ : दिलीप वळसे पाटील

Rohan_P

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोविड पॉझिटिव्ह

Sumit Tambekar
error: Content is protected !!