Tarun Bharat

“ठाकरे सरकारच्या माध्यमातून हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम सुरू”

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

आमदार नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीकेची मालिका सुरूच आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबईतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. गणेश मंडळांना राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे कोणत्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे, याबाबत राज्यपालांना माहिती देण्यात आली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना, नितेश राणे यांनी “हिंदूमध्ये भितीचं वातावरण निर्माण करण्याचं काम ठाकरे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मेट्रो, बेस्टच्या कार्यक्रमात कोरोना दिसत नाही का? ” अशी जोरदार टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

नितेश राणे म्हणाले, सण समारंभाच्या वेळी कोरोना दिसतो पण मेट्रोच्या कार्यक्रमात गर्दी दिसत नाही, काल बेस्टचा कार्यक्रम झाला तिथे स्वतः मुख्यमंत्री होते तिथे यांना गर्दी दिसत नाही. यांच्या पार्ट्या चालतात तिथे या लोकांना कोरोना दिसत नाही. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन झालं तिथे यांनी गर्दी दिसत नाही. पण जिथे जिथे आमचे सण आले त्यावेळी यांना कोरोना दिसतो. मुंबईमध्येही अशीच अवस्था आहे.”

हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम”

“दोन दिवसात लोकल चालू ..१७ ऑगस्ट पासून शाळा चालू ..मग दोन डोस घेतलेल्यांना मंदिर दर्शन का नाही ? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !” अशा शब्दांमध्ये भाजपा नेते नितेश राणे यांनी ट्विटकरत महाविकासआघाडी सरकावर टीका केली आहे.

मुंबईत राहणारा ‘हिंदू खतरे में है’

करोनाचा शिरकाव झाल्यापासून सरकारकडून सण उत्सवांसाठी नियमावली ठरवून दिली जात असून, याच मुद्यावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “हिंदू समाज… हिंदू सण… हिंदू संस्कृतीवर नियोजित पद्धतीने हल्ले केले जात आहेत आणि तेही महाराष्ट्र सरकारच्या मदतीने… असंख्या घटना कानावर येत आहेत. पश्चिम बंगालसारखा मुंबईत राहणारा “हिंदू खतरे में है” असं सांगण्याची वेळ आली आहे”,  असं नितेश राणे म्हणालेले आहेत.

“मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना; नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय?”

नितेश राणे ठाकरे सरकार व शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. नव्या शिवसेनेचा आणि मराठीचा संबंध काय? आधी मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार केला. मराठीचे खरे मारेकरी ही पेंग्विनची सेना, बाळासाहेब यांची सेना आहे कूठे? मराठी माणसाची संघटना म्हणे..मग..बेस्टच्या जागा – कनाकीय, बीएमसी कॉन्ट्रॅक्ट – दिनो, रात्रीच्या पार्ट्या – पटानी ..कपुर .. जॅकलीन, इथे कुठे शाखा प्रमुख दिसत नाहीत ? मराठी माणूस दिसत नाही ? असं नितेश राणे म्हणालेले आहेत.

Related Stories

दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर – आदित्य ठाकरे

Abhijeet Shinde

”या महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणचा नियोजित पद्धतीने खून केला आहे!”

Abhijeet Shinde

केंद्र सरकारने जूनपासून कधीही दूध भुकटी आयात केली नाही

datta jadhav

नॅचरल गॅसच्या किंमतीत 62 टक्क्यांची वाढ

datta jadhav

सातारा जिल्ह्यात ७० जण कोरोना बाधित

Abhijeet Shinde

यंदा मान्सूनचे आगमन चार दिवस उशिरा, केरळात 5 जूनला दाखल होणार

Rohan_P
error: Content is protected !!