Tarun Bharat

ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचत्वात विलीन केलं

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाविकास आघाडीकडून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली. त्यानंतर हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कळसूत्री सरकारने अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पंचसूत्रीने काही होणार नाही. याने महाराष्ट्रच्या विकासाला पंचतत्वात विलीन केले आहे. हे बजेट विकासाला चालना देऊ शकत नाही. या बजेटमध्ये काहीही नाही. मागील बजेटमधील चालू कामांच्या घोषणा या बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत.

मागील 2 वर्षात या सरकारने राज्यातील गोर गरीब, दीन-दलित, शेतकरी, कामगार, मराठा, ओबीसी, आदिवासी अशा सर्व घटकांच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली आहेत. आमच्याच योजनांचं पेडिट घेण्याचा प्रयत्न सध्याचं सरकार करत आहे. समृद्ध महामार्गासह बुलेट टेनला विरोध करणारं सरकार आता त्याचं श्रेय घेण्याचं प्रयत्न करत आहे, असाही आरो फडणवीस यांनी केला आहे.

Related Stories

मुंबई सेंट्रल येथील 62 झोपडय़ा जमीनदोस्त

datta jadhav

कोल्हापूरच्या संकल्प सभेतून शरद पवारांचा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले…

Archana Banage

…तर महाराष्ट्र बंद करावा लागेल; उद्धव ठाकरेंचा केंद्राला इशारा

Archana Banage

येत्या शैक्षणिक वर्षात फी वाढ नाही : शालेय शिक्षण विभागाकडून आदेश

Tousif Mujawar

मुंबईत शुक्रवारी उच्चांकी रुग्णवाढ; तरीही शिवाजी पार्क, दादर मार्केटमध्ये मोठी गर्दी

Tousif Mujawar

कोयना धरण प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Patil_p