Tarun Bharat

ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; १२ आमदारांचं निलंबन रद्द

ऑनलाईन टीम/तरुण भारत

भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. दरम्यान, इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी, यासाठी पावसाळी अधिवेशानावेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनासमोर गोंधळ घातल्याप्रकरणी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी १२ आमदारांना निलंबित केलं होत.

दरम्यान, पावसाळी अधिवेशनावेळी अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर याप्रकरणी १२ आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत सांगत निलंबन रद्द केलं आहे.

१२ आमदारांचं निलंबन सुप्रीम कोर्टाकडून रद्द केल्यानंतर भाजप आमदारांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महा विकास आघाडी सत्तेत आल्यापासून मनमानी कारभार करत आहे, तसेच सरकार सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचाही आरोप केला आहे, अशी टीका केली आहे.

Related Stories

तांबवे दंडभाग परिसरात ट्रॅक्टर चालकास लुटमारीचा प्रयत्न

Archana Banage

आव्हाड, यशोमती ठाकूरनंतर आता काॅंग्रेसचा मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप

Abhijeet Khandekar

पुण्यात गाईचे पाय बांधून अत्याचार

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत 151 नवे रुग्ण

Archana Banage

हिमाचल प्रदेशात 7852 पदांवर केली जाणार भरती

Tousif Mujawar

फोटोंचा गैरवापर करुन निर्मात्याची बदनामी

Patil_p