Tarun Bharat

ठिबक सिंचनला मिळणार बागायतचे अनुदान

संबंधितांना अर्जाचे आवाहन, उत्पादन वाढीसाठी योजना महत्वाची

प्रतिनिधी / बेळगाव

बागायत उत्पादकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी खात्यामार्फत ठिबक सिंचनसाठी अनुदान उपलब्ध केले जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत लहान ठिबक सिंचन विभागांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. अनुसुचित जाती-जमातीतील शेतकऱयांना 90 टक्के तर अल्पभूधारक शेतकऱयांना 40 टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. संबंधितांना अर्ज करण्याचे आवाहन बागायत खात्याने केले आहे.

अलिकडे बागायत क्षेत्रात वाढ झाली आहे. तब्बल दोन लाखांहून अधिक शेतकरी बागायत शेती फुलवितात. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. किमान पाच हेक्टर क्षेत्रापर्यंत ठिबक सिंचन योजना राबविणाऱया अल्पभूधारक शेतकऱयांना 40 टक्के तर मागासवर्गीय शेतकऱयांना 90 टक्क्मयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. जिल्हय़ात जांभूळ, पेरू, केळी, दाक्षे, काजू, आंबा, चिंच आदी बागायतदारांची संख्या वाढली आहे. याबरोबरच गुलाब, मोगरा, सुर्यफूल आदी फुल उत्पादकांची संख्याही वाढली आहे. अशांना ठिबक सिंचन योजना फायदेशीर ठरणारी आहे.

ठिबक सिंचन पद्धतीमुळे 50 टक्के पाण्याची बचत होवून पाणी थेट वृक्षांच्या मुळांपर्यंत पोहोचते. त्यामुळे झाडांची जोमाने वाढ होवून उत्पादनही वाढते. कमी पाण्यात अधिक लागवड करण्यासाठी ठिबक सिंचन महत्वाची ठरते. यामुळे अलिकडे ठिबक सिंचनद्वारे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. संबंधित बागायतदार शेतकऱयांनी जवळच्या बागायत खात्याच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Related Stories

लोंढा ते वास्को रेल्वे मार्गावर दोन ठिकाणी कोसळली दरड

mithun mane

तालुक्यात ऊस तोडणीची लगबग

Patil_p

नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून होणार सुरू

Amit Kulkarni

हनुमान नगर येथे मंदिरात चोरी

Patil_p

तांत्रिक समस्येमुळे शिक्षकांचे पगार अडकले

Amit Kulkarni

अँब्युलन्स आणि ट्रॅक्टरमध्ये भीषण अपघात रुग्णाचा जागीच मृत्यू

mithun mane