Tarun Bharat

ठिबक सिंचन अनुदान वाटपात करमाळा तालुका जिल्ह्यात अव्वल

तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांचे प्रतिपादन

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याची योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने एकच अर्ज केल्यानंतर सोडत पद्धतीने वेगवेगळे शेतकऱ्यांना त्याच्या अनुदानाचा लाभ प्रोत्साहनपर स्वरूपात मिळत असतो. करमाळा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आत्तापर्यंत 10 कोटी प्रोत्साहनपर निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला असल्याची माहिती करमाळा तालुका कृषी अधिकारी वाकडे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर बाळासाहेब शिंदे आणि उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रवींद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडीबीटी योजनेअंतर्गत करमाळा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने ठिबक सिंचन / तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण ,कांदाचाळ/ शेडनेट /संरक्षित शेती, शेततळे अस्तरीकरण, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना आदी बाबींवरती प्रोत्साहनपर अनुदान दिले गेले असून ठिबक सिंचनाच्या अनुदान वाटपामध्ये करमाळा तालुका हा जिल्ह्यात अव्वल आहे ही भूषणावह गोष्ट आहे.

आत्तापर्यंत करमाळा तालुक्यातील 1100 लाभार्थींना ठिबक सिंचन चे 4 कोटी 61 लाख अनुदान प्राप्त झालेले असून कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत 382 लाभार्थ्यांना 1 कोटी 99 लाख, कांदाचाळ/ शेडनेट/ संरक्षित अंतर्गत 55 लाभार्थींना 51 लाख 33 हजार, शेततळे अस्तरीकरण अंतर्गत 67 लाभार्थींना 45 लाख 25 हजार आणि मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना पूरक अनुदान अंतर्गत 988 लाभार्थ्यांना 2 कोटी 15 लाख असा एकूण 9 कोटी 71 लाख 58 हजार रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

शेतकऱ्यांनी महाडीबीटी च्या योजनांचा लाभ घ्यावा- आमदार संजयमामा शिंदे यांचे आवाहन.


महाडीबीटी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2021- 22 अंतर्गत करमाळा तालुक्याला जवळपास 10 कोटींचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झाले असून महाडीबीटी च्या योजनांचा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले. महाडीबीटी च्या कृषी यांत्रिकरण योजना अनुदान अंतर्गत साहित्य वाटप प्रसंगी ते बोलत होते.
ज्ञानदेव किसन अवचर यांना 125000 ट्रॅक्टर , राजेंद्र कुंडलिक माने यांना हायड्रोलिक पलटी नांगर साठी 70 हजार रुपये अनुदान, समाधान सूर्यभान भोगे यांना पाच फुटी रोटावेटर साठी 42 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले होते. संबंधित शेतकऱ्यांना साहित्याचे वाटप आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, कृषी पर्यवेक्षक काशिनाथ राऊत, कृषी पर्यवेक्षक सुहास पोळके, कृषी पर्यवेक्षक मधुकर मारकड ,कृषी सहाय्यक दत्ता वानखेडे ,कृषी सहाय्यक बाळू गाडे ,कृषी पर्यवेक्षक ज्ञानदेव खाडे, कृषी सहाय्यक गणेश माने ,कृषी सहाय्यक नरेंद्र गोफने यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

आरे मेट्रो कारशेड संदर्भात सोमय्यांच ट्विट; म्हणाले,काम थांबवण्याचा आदेश नव्हता…

Abhijeet Khandekar

इंद्रायणी थडीला उद्यापासून प्रारंभ

prashant_c

सोन्याचे दर घसरले; 2 दिवसात 5 हजार रुपयांची घट

datta jadhav

”फळपिक विमा योजना खरीप हंगाम नुकसान भरपाईसाठी संपर्क साधा”

Abhijeet Khandekar

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली

Archana Banage

सोलापूर : वैरागमध्ये सात लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Archana Banage