Tarun Bharat

ठेकेदाराच्या प्रतिकात्मक पुतळय़ाची गाढवावरुन धिंड

छावा क्षात्रवीर सेनेचे आंदोलन : शिवस्मारकाचे काम अधर्वट ठेवल्याने निषेध

प्रतिनिधी /सातारा

पोवईनाक्यावरील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाच्या परिसरात शिवस्मारकाच्या सुशोभिकरणाचे काम अर्धवट ठेवणाऱया ठेकेदाराचा निषेध करत सातारा जिल्हा छावा क्षात्रवीर सेनेच्या पदाधिकाऱयांनी ठेकेदाराच्या प्रतिकात्मक पुतळय़ाची गाढवावरुन धिंड काढली. या पाच ते दहा मिनिटांच्या आंदोलनाने परिसरात खळबळ उडाली.

शिवस्मारकाचे काम साताऱयातील एका ठेकेदाराने घेतले असून ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होवूनदेखील गेल्या अनेक दिवसांपासून ठेकेदाराने काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची एकप्रकारे विटंबनाच होत असल्याचा आरोप करत क्षात्रवीर सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गत आठवडय़ात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देवून आठ दिवसात हे काम सुरु करण्याची मागणी केली होती.

यावेळी ठेकेदारासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱयांना काळे फासण्याचा इशाराही दिला होता. मात्र, आठ दिवस उलटूनही काम सुरु न झाल्याने गुरुवारी अचानक क्षात्रवीर सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोन गाढवे आणून त्यावर ठेकेदाराचा प्रतिकात्मक पुतळा ठेवून धिंड काढली. निषेधाच्या जोरदार घोषणाही दिल्या. आंदोलनाला परवानगी नसल्याने गनिमी कावा करत अचानक करण्यात आलेल्या प्रकारामुळे काही वेळ परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलीस येण्याअगोदर छावा क्षात्रवीर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तिथून गायब झाले. छावा क्षात्रवीर सेनेचा गनिमी कावा सातारा येथील शिवस्मारकाचे प्रलंबित काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी आज सातारा जिल्हा क्षात्र वीर सेनेच्या वतीने संबंधित ठेकेदाराची पुतळ्याची गाढवावरुन प्रतिकात्मक धिंड काढण्यात आली. आठ दिवसापूर्वी याच कामासाठी सेनेच्या वतीने आंदोलन करून आठ दिवसात काम सुरू करावे असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने कोणतेही काम सुरू न झाल्याने आज सदरच्या ठेकेदारांची पुतळ्याची प्रतिकात्मक गाढवावरून धिंड काढून निषेध करण्यात आला.

Related Stories

‘रेमडेसिवीर’चे वितरण अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच

datta jadhav

बलात्कार करुन महिलेला दोन लाखाचा गंडा

Patil_p

दिलासा : कोरोनामुक्ती ३० हजारांच्या पार

Archana Banage

कृष्णा कारखान्याची निवडणूक 26 जूनला?

Patil_p

सातारा : नागठाणेच्या व्यापारी गाळ्यांसंदर्भातील आरोप चुकीचे

datta jadhav

महाबळेश्वर पर्यटकांसाठी खुले, पण..

Archana Banage
error: Content is protected !!