Tarun Bharat

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

वार्ताहर/ संगमेश्वर

तालुक्यातील आरवली-राजीवली मार्गावर मुरडव येथे डंपर आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात योगेश तुकाराम बाटे (28) हा जागीच ठार झाला. या प्रकरणी डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास योगेश तुकाराम बाटे मोटारसायकलने (एमएच-04डीएच-1983) आरवलीहून मुरडवकडे चालला होता. मुरडव येथील छोटय़ाशा वळणावर समोरून येणाऱया डंपरच्या (एमएचö04सीयू-9663) उजव्या बाजूच्या मागील चाकावर दुचाकी आदळली. यात डंपरचे चाक योगेशच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. 

  या अपघाताची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, शिवसेना विभागप्रमुख मनू शिंदे, आंबव पोलीस चेकपोस्टवरील पोलीस गणेश बिक्कड, संकेत भुवड, सुनील गंगारकर, तुकाराम मेणे, दिनेश परकर, मुकेश चव्हाण, धर्मा कोंडविलकर आदी ग्रामस्थ घटनास्थळी गेले व शवविच्छेदनासाठी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. डॉ. प्रदीप शिंदे यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी डंपरचालक राकेश लक्ष्मण कांबळे याच्यावर 304(अ), 279 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघाताची खबर पोलीस पाटील राजा मेणे यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताचा तपास माखजनचे हेडकॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, तेजस्विनी गायकवाड करीत आहेत

Related Stories

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात नवी नियमावली जारी

Abhijeet Khandekar

दोन दिवसात रूग्णालयाचे फायर ऑडिट करा!

Patil_p

नादुरुस्त बार्ज तेथून हालविण्यात यावी. रेडी ग्रामस्थांची सरपंचाकडे मागणी.

NIKHIL_N

मंडणगडात 5 लाखाचे अडीच हजार किलो गोमांस जप्त

Patil_p

दीक्षा सावंत हिच्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक

Tousif Mujawar

”मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा’ कार्यक्रम”

Archana Banage