Tarun Bharat

डचेस ऑफ ससेक्सने जिंकली न्यायालयीन लढाई

मेगन मर्केलची टॅब्लॉइडने मागितली प्रंट-पेज माफी : भरपाई देखील प्राप्त

वृत्तसंस्था/ लंडन

डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल हिची अनेक वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर ब्रिटिश वृत्तपत्राने माफी मागितली आहे. उच्च न्यायालयाने वृत्तपत्राला ‘द डचेस ऑफ ससेक्स’ मथळय़ांतर्गत वृत्तपत्रात एक दीर्घ नोटीस छापण्यास भाग पाडले. फेब्रुवारी 2019 मध्ये मर्केल यांच्या खासगीत्वाचे उल्लंघन करण्याशी संबंधित हे प्रकरण होते. यात राजपुत्र हॅरीसोबत विवाहानतंर मेगनकडून 2018 मध्ये स्वतःचे वडिल थॉमस मर्केल यांना लिहिण्यात आलेल्या 5 पानी पत्राचे काही हिस्से वृत्तपत्राकडून छापण्यात आले होते.

वडिलांना स्वतःच्या हाताने लिहिण्यात आलेल्या पत्राचे काही भाग प्रकाशित करून असोसिएटेड न्यूजपेपरने खासगीत्वाचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाला आढळून आले. लंडन उच्च न्यायालयाने टॅब्लॉइडला माफीनामा एक आठवडय़ापर्यंत होमपेजवर प्रकाशित करण्याचा, ज्याच्या हायपरलिंकमध्ये न्यायालयाचा आदेश जोडलेला असावा असा आदेश दिला आहे. लेखी माफीसह मर्केल यांना 1.7 दशलक्ष डॉलर्सची भरपाई देखील दिली जाणार आहे. याचबरोबर युकेच्या प्रकाशकाच्या विरोधात खटला लढविण्यासाठी आलेल्या खर्चाची 90 टक्के रक्कमही मिळणार आहे.

Related Stories

तिसरा डोस देणारा पहिला देश ठरला इस्रायल

Patil_p

पाकिस्तान : शाळा सुरू

Patil_p

‘हा’ रक्तगट असेल तर हृदयविकाराचा धोका अधिक

Patil_p

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट; 6 ठार

datta jadhav

भारतीय वंशाचे सत्या नाडेला झाले मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष

Tousif Mujawar

रशियाकडून सीमेवर इस्कंदर क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात

Patil_p