Tarun Bharat

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अटक

ऑनलाईन टीम / सांगली : 

विट्याचे तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केल्याप्रकरणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला अखेर 15 दिवसानंतर पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूच्या पकडलेल्या वाहनांचा दंड रद्द करावा, या कारणावरून झालेल्या वादातून चंद्रहार पाटील आणि त्याचा साथीदार सागर सुरवसे याने 3 मे रोजी तहसीलदार ऋषीकेश शेळके यांना मारहाण केली होती. त्यानंतर दोघेही फरार होते. अखेर 15 दिवसानंतर सांगलीच्या स्थानिक क्राईम ब्रँच आणि विटा पोलिसांनी आटपाडी तालुक्यातील दिघंची परिसरातून चंद्रहार आणि त्याच्या  साथीदाराला अटक केली.

चंद्रहारला अटक करावी, यासाठी जिल्ह्यातील महसूलच्या अधिकाऱ्यांनी एक दिवस कामबंद आंदोलन देखील केले होते. त्यानंतर पोलिसांनी चंद्रहारच्या अटकेसाठी तीन पथके तयार करण्यात आली होती. ही पथके मागील 15 दिवस चंद्रहारच्या मागावर होती.

Related Stories

जतमध्ये बंधाऱ्यात बुडून चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू

Archana Banage

कसबे डिग्रज ग्रामपंचायतीत ठेकेदारांची मक्तेदारी

Archana Banage

Sangli : जन्मदात्या आईचा मुलाकडून दगडाने ठेचून खून

Abhijeet Khandekar

कोयना धरणातील पाण्याचा रंग पुन्हा बदलला..!

Archana Banage

लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप सोसा.ली ची विश्रामबाग शाखा ठरली मान्सून कँपेन विनर

Archana Banage

विजय ताड खून प्रकरण: चार संशयित आरोपींना आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी

Archana Banage