Tarun Bharat

डब्यात तोंड अडकलेल्या कुत्र्याची सुटका

प्राणी दया संघटनेच्या पथकाचा प्रयत्न : जनावरांचे अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड्स बसवा

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील भटक्मया जनावरांना विविध अडचणी भेडसावत असतात. एका भटक्मया कुत्र्याने पाणी पिण्यासाठी डब्यामध्ये तोंड घातले असता त्यामध्ये तोंड अडकले. हिंदवाडी परिसरात तोंडावर डबा घेऊन फिरणाऱया कुत्र्याची सुटका प्राणी दया संघटनेच्या (बावा) पथकाने केली.

गेल्या दोन दिवसांपासून सदर कुत्रा सर्वोदय कॉलनी, हिंदवाडी परिसरात फिरत होता. तोंडावर अडकलेला डबा काढण्यासाठी बराच प्रयत्न केला, पण निघाला नाही. ही माहिती प्राणी दया संघटनेच्या पदाधिकाऱयांना समजल्यानंतर पाच जणांच्या पथकाने कुत्र्याची सुटका केली. अमित चिवटे, प्रमोद कदम, प्रणव बेळगावकर, भुवन कडोली, शिवराम शहापूर, श्रीधर जोशी आदींनी प्रयत्न करून कुत्र्याच्या तेंडावर अडकलेला डबा हटवून त्याला मोकळे केले. 

राष्ट्रीय महामार्गाशेजारी बॅरिकेड्स बसविण्याची मागणी

राष्ट्रीय महामार्गावरून असंख्य वाहने धावत असतात. त्यामुळे या वाहनांच्या अपघातात अनेक जनावरांचा जीव जातो किंवा मूक जनावरे अपंग होतात. रस्ता पार करताना अपघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुक्मया जनावरांचे  अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाशेजारी बॅरिकेड्स बसविणे आवश्यक आहे. त्याकरिता प्राणी मित्र संघटनेकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. पी. एम. ऑफिससह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाकडे विनायक केसरकर यांनी तीन वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. तरीदेखील अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही. राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना झालेल्या अपघातात भटक्मया कुत्र्याला समोरचा पाय गमवावा लागला. सदर माहिती प्राणी मित्र संघटनेला समजल्यानंतर सदर कुत्र्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन राष्ट्रीय महामार्गाशेजारी बॅरिकेड्स बसवावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

Related Stories

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथचा वर्धापनदिन

Amit Kulkarni

24 तास पाणी पुरवठय़ासाठी अखेर कंत्राटदार निश्चित

Patil_p

गुरुवंदनासाठी मराठा समाजाची जय्यत तयारी

Amit Kulkarni

सातवा निमंत्रितांचा साईराज चषक मोहन मोरे संघाकडे

Amit Kulkarni

किल्ला खंदकापासून कालव्यांची खोदाई

Amit Kulkarni

आयपीएल स्थगित झाल्यानंतर शहरात गल्ली क्रिकेटचा अवलंब

Amit Kulkarni