Tarun Bharat

डाबरला 481 कोटी रुपयांचा नफा

Advertisements

मुंबई : डाबरने दुसऱया तिमाहीअखेर 481 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याचे सांगण्यात येते. डाबरने यासंबंधीची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. दुसऱया तिमाहीअखेर कंपनीला 441 कोटी रुपयांचा नफा होणार असल्याचा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. त्याप्रमाणे किंबहुना जास्तच नफा डाबरने पदरात पाडून घेतला आहे. मागच्या वषी दुसऱया तिमाहीअखेर कंपनीने 403 कोटी रुपये नफ्याअंतर्गत कमावले होते. दुसऱया तिमाहीत स्थानिक विक्रीमध्ये 16 टक्के वाढ दर्शवली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कंपनीचे एकत्रित उत्पन्न 2212 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. कंपनीने प्रती शेअर मागे 1.75 लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

Related Stories

दमानींच्या कंपनीचे समभाग उच्चांकी पातळीवर

Patil_p

शेअर बाजारात पुन्हा उत्साहाचे वातावरण

Amit Kulkarni

तेजीचा ‘सप्तसूर’

Omkar B

बजाजचे सिंघल यांचा कालावधी वाढवला

Patil_p

स्पेक्ट्रम लिलावात रिलायन्स भारी

Patil_p

दुसऱया दिवशीही बाजारात घसरणच

Patil_p
error: Content is protected !!