Tarun Bharat

डिचोलीतील मतदार या निवडणुकीत मंत्र्याला निवडून आणणार

येणाऱया पाच वर्षांत डिचोली तालुक्मयातील एकही प्रकल्प राहणार नाही. डिचोली मतदारसंघाचा चौफेर विकास करू. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन. राजेश पाटणेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ.

डिचोली/प्रतिनिधी

डिचोली मतदारसंघातील अनेक प्रकल्प आज सरकारच्या विचाराधीन असून सरकारने एकाही प्रकल्पाकडे पाठ केलेली नाही. येणाऱया पाच वर्षांत डिचोली मतदारसंघाबरोबरच डिचोली तालुक्मयातील सर्व प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी भाजपला जनतेने साथ देणे काळाजी गरज आहे. कारण येणारे सरकार हे भाजपचेच असणार आणि डिचोली मतदारसंघातील जनता यावेळी राजेश पाटणेकर यांच्या रूपाने केवळ आमदारच नव्हे तर मंत्र्याला निवडून आणणार, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यां?नी डिचोली येथे व्यक्त केला.

डिचोली मतदारसंघाचे भाजप उमेदवार सभापती राजेश पाटणेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ गावकरवाडा डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेला श्रीफळ अर्पण करून करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी उमेदवार राजेश पाटणेकर, मंडळ समिती अध्यक्ष विश्वास गावकर, वल्लभ साळकर, महिला अध्यक्षा शर्मिला पळ, युवा अध्यक्ष अनिकेत चणेकर, किसान मोर्चा अध्यक्ष विठ्ठल करमळकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक सतीश गावकर, विजयकुमार नाटेकर, निलेश टोपले, सुदन गोवेकर, दिपा पळ व इतरांची उपस्थिती होती.

सभापती राजेश पाटणेकर यांनी सभापती पदाचा मान राखताना योग्य अआम केले आहे. डिचोली मतदारसंघासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असून त्यांच्या नम्र आणि साध्या स्वभावामुळे त्यांचा अनेक नेते गैरफायदा घेतात. त्यांनी कोणाकडेही कधीच राजकारण केले नाही. मात्र या निवडणुकीत त्यांच्या या स्वभाव आणि काम करण्याची धडाडी याच कारणांमुळे ते पुन्हा निवडून येणार आणि राज्य सरकारात मंत्री असणार. डिचोली मतदारसंघाचा आणि पर्यायाने तालुका आणि राज्याचा विकास साधण्यासाठी राज्यात भाजपच सरकारची आवश्यकता आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.

यावेळी बोलताना सभापती राजेश पाटणेकर यांनी, गोवा राज्याचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला विकास पाहता या निवडणुकीत गोव्याची जनता भाजपवर ठाम विश्वास ठेवणार आणि राज्यात निवडून आणणार. पुढील सरकार हे भाजपचेच असणार. आणि या डबल इंजिन सरकारमुळे राज्याच्या विकासाला आणखीन गती मिळणार आहे, असे म्हटले.

नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी यावेळी, डिचोली नगरपालिका क्षेत्रातील सर्व भाजप नगरसेवक एकसंध आणि सक्रिय असून येणाऱया निवडणुकीत डिचोली मतदारसंघात भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांचा विजय हा निश्चित आहे. केवळ भाजप सरकारच गोव्याचे हित जाणून राज्याला.पुढे नेऊ शकते. असे म्हटले.

यावेळी नगरसेवक सतीश गावकर, सरपंच घनश्याम राऊत, मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, महिला अध्यक्षा शर्मिला पळ, युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत चणेकर यांनीही आपले विचार प्रकट करताना डिचोली मतदारसंघात याहीवेळी भाजपचाच उमेदवार निवडून येणार आणि विकास होणार असा विश्वास व्यक्त केला. श्री शांतादुर्गा देवीचरणी श्रीफळ अर्पण करण्यात आला. तसेच डिचोली शहरातील इतरही मंदिरांमध्ये देवतांचे दर्शन घेऊन श्रीफळ अर्पण करण्यात आले. व प्रचाराला प्रारंभ करण्यात आला.

Related Stories

‘स्मार्ट सिटी’च्या कामाची विशेष ऑडिटद्वारे चौकशी करा

Amit Kulkarni

म्हाऊस येथे धोकादायक झाडे हटविण्याचे काम सुरू

Amit Kulkarni

नियोजन, सांख्यकी आणि मूल्यमापन संचालनालयातर्फे दिव्यांगांसाठी वेबिनार

Amit Kulkarni

सोमवारी 125 जण कोरोनामुक्त

Patil_p

मडगाव पालिका क्षेत्रात पाच वर्षांत विविध विकासकामे मार्गी

Patil_p

धारबांदोडय़ाच्या विकासासाठी शैक्षणिक प्रकल्प

Amit Kulkarni
error: Content is protected !!