Tarun Bharat

डिचोलीत कार व दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार.

डिचोली/प्रतिनिधी :

   डिचोली ते म्हापसा या महामार्गावर बोर्डे डिचोली येथील साष्टीवाडा येथे व्हेगन आर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक मूळ उत्तर प्रदेशचा युवक जागीच ठार झाला. एका कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीने थेट कारला जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचालकाचा उजवा हात तुटून अपघातग्रस्त कारच्या आत डेशबोर्डवर पडला, तर दुचाकीचालक सोहरब खान हा घटनास्थळावरून सुमारे तीस मीटर उंचावरून दुर फेकला गेला आणि जागीच गतप्राण झाला.

   सदर अपघात काल शनिवारी (दि. 11 जाने.) दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास घडला. डिचोलीहून म्हापसाच्या दिशेने जाणाऱया जीए 03 टी 7236 हि व्हेगन आर कारवर म्हापसातून डिचोलीच्या दिशेने येणाऱया जीए 07 व्हाय 4786 या डय़?क या मोटरसायकलने इतर वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात जबरदस्त धडक दिली. या धडकेत दुचाकी गाडीचा चुरडा झालाच शिवाय दुचाकीचालक सोहरब खान (मूळ उत्तर प्रदेश, सध्या राहणारा मंडूर डोंगरी) हा युवक घटनास्थळावरून सुमारे तीस मीटर अंतरावर उसळून पडला.

 उजवा हात तुटून कारच्या डेशबोर्डवर

समोरील इतर एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात सोहरब याने वाढविलेला गाडीचा वेग हा नियंत्रणा बाहेरील होता. असेच हा अपघात प्रत्यक्षपणे पाहिलेल्या लोकांनी सांगितले. ओव्हरटेक करताना व्हेगर आर कारवर दिलेली धडक इतकी जोरदार होती कि दुचाकीचालक सोहरब याचा उजवा हात दर्शन काच तोडून कारच्या डेशबोर्डवर डाव्या बाजूने पडला होता. सदर दृष्य व हात पाहील्यानंतर अनेकांना सदर धडक किती प्रमाणात वेगवान होती याची प्रचिती आली.

वाहतूक सुरळीत करण्यात स्थानिकांचे पोलिसांना सहकार्य.

   हा अपघात घडला त्यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या डिचोली युवा काँग्रेसचे अध्यक्ष मनोज नाईक यांनी तत्काळ 108 रूग्णवाहिकेला संपर्क साधला आणि लागलीच मदत कार्याला सुरूवात झाली. यावेळी व्हेगन आर कारमध्ये चालक रामा हेडेकर (रा. मोरजी) यांच्यासह परदेशी पर्यटक जोडपे होते. त्यांना वाहनातून बाहेर काढण्यात स्थानिकांनी मदत केली. तसेच यावेळी या भागातील वाहतूक सुरळीत करण्यात स्थानिकांनी पोलिसांना सहकार्य केले.

Related Stories

ओल्ड गेवातील वादग्रस्त बंगल्याचे बांधकाम पाडा

Amit Kulkarni

आज-उद्या विद्यालये दुपारी 12 पर्यंतच

Amit Kulkarni

अटल सेतू – जोड रस्त्यादरम्यान दरी वाढल्याने वाढला धोका

Amit Kulkarni

वीज खात्यात आठ महिन्यात 800 कोटींच्या योजना हा विक्रम

Omkar B

कोडली येथील इसमाचा मृतदेह सापडला

Patil_p

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर एसीजीएल कामगारांचा संप स्थगित

Amit Kulkarni
error: Content is protected !!