Tarun Bharat

डिचोलीत 7 रोजी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त नौकानयन स्पर्धा

डिचोली नगरपालिका पातळीवर आयोजन. गावकरवाडा येथे नदीवर रंगणार नौकानयन स्पर्धा. देवीची पालखी जाणार नदीकिनारी.

डिचोली/प्रतिनिधी

गावकरवाडा डिचोली येथील श्री देवी शांतादुर्गेच्या मंदिरासमोरील नदीवर सोम. दि. 7 ऑक्टो. रोजी रात्री त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने नौकानयन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामस्थ गावकर मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित हि स्पर्धा डिचोली नगरपालिका पातळीवर घेण्यात येणार आहे. स्पर्धेत तीन ते पाच फुट लांबीच्या नौकांना प्रवेश दिला जाणार आहे.

  स्पर्धेतील विजेत्यांना डिचोली कोमुनिदाद पुरस्कृत प्रथम रू. 10,000/-, द्वितीय रू. 7000/-, तृतीय रू. 5000/- चे तर पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी नौका रात्री 8 वा. श्री शांतादुर्गा कोमुनिदाद मंडपात दाखल व्हायला हवी. मंडपात या नौकांचे प्रदर्शन झाल्यानंतर रात्री या नौका नदी पात्रात सोडल्या जाणार आहेत. यावषी नदीवर जलस्रोत खात्यातर्फे बंधारा घालण्यात आल्याने पाणी आवश्यक प्रमाणात साठविण्याची व्यवस्था होणार. त्यामुळे या नौकानयन स्पर्धेत सहभागी नौकांनाही विहरण्यात सोयीचे होणार. रात्री देवी श्री शांतादुर्गेची पालखी नदीकिनारी दाखल झाल्यानंतर नौकानयन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.

  साखळीत होणाऱया राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धेच्या प्रेरणेने डिचोलीत गावकरवाडा येथे नदी पात्रात हि नौकानयन स्पर्धा आयोजित करण्यात येते. सुमारे 10 वर्षांपूर्वी डिचोलीत हि स्पर्धा आयोजित करण्यात येते. प्रारंभीच्या काळात ठराविकच नौका या स्पर्धेत सहभागी व्हायच्या. परंतु नंतरच्या काळात मोठय़ा संख्येने नौकांचा सहभाग वाढला. डिचोली नगरपालिका पातळीवर स्पर्धा असली तरी डिचोली नगरपालिका क्षेत्रातील कालाकार या नौका साकारण्यात आपला जीव ओतून काम करीत असतात.

   आकर्षक कलाकृती व विद्यूत रोषणाईने रंगतदार वाटणाऱया या नौका नदीच्या पात्रात उतरल्यावर नदीचे पात्रही खुलून जाते. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी डिचोलीतील मोठय़ा संख्येने लोक गावकरवाडा येथे नदीकिनारी उपस्थिती लावतात. नदीकिनारी असलेल्या पूरप्रतिबंधक योजनेतील बांधावर साकारण्यात आलेल्या वॉकिंग टेकमुळे लोकांना वरून नदीपात्रातील नेत्रदीपक सोहळा न्याहाळण्याची चांगली संधी मिळते.

Related Stories

पेडणे पालिकेची पुरातन इमारत पूर्ण पाडू नये

Amit Kulkarni

निरंकाल येथील जीर्ण झाडामुळे धोका

Amit Kulkarni

राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा उपक्रम प्रथमच गोव्यात

Amit Kulkarni

राजकीय दबावात लता गांवकर यांची बदली

Omkar B

रोटरी क्लब ऑफ मिरामारतर्फे सिनेटायझर व मास्क प्रदान

Patil_p

वास्कोत 3 रोजी श्री दामोदर भजनी सप्ताह साजरा होणार

Amit Kulkarni